बदलत्या हवामानामुळे सध्या कांद्याच्या गेंदा वर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा कांदा बीजोत्पादनावर देखील परिणाम होणार आहे.
त्यामुळे पडणाऱ्या रोगाला वेळेत नियंत्रणासाठी शेतकरी कोणती औषध फवारणी करणे गरजेचे आहे. याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
कांदा पिकाला गेल्या काही वर्षापासून सरासरी प्रमाणे चांगला दर मिळत आहे. तर कांदा लागवड क्षेत्रामध्येही गेल्या काही वर्षापासून वाढ होत आहे.
त्यामुळे कांदा बियाण्यांची मागणी देखील वाढली आहे. ऊसा पाठोपाठ कांदा सर्वात मोठे नगदी पीक आहे. तर कांदा पिकाबरोबरच कांदा बियाण्यातूनही उत्पादन मिळवण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न असतात.
अलीकडील बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या गेंदा वर मोठ्या प्रमाणावर आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
तर त्यामुळे त्याचा बीजोत्पादन परिणाम होणार असल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त केल्यास उत्पादनातही वाढ होणार आहे.
कांद्याचे लागवड योग्य क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे बियाणे विकत घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. परिणामी कांद्याचे बियाणे देखील महाग झाली आहे.
तर काही शेतकरी घरगुती कांद्याचे लागवड करून त्यापासून बीजोत्पादन करत आहेत.
3 हजार रुपये किलो प्रमाणे बियाणाला देखील भाव मिळत आहेत. यंदा तर 35 हजार ते 55 हजारपर्यंत प्रतिक्विंटल असे दर मिळालेले आहेत.
त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बीजोत्पादनालाच आपल्या उत्पादनाचे साधन बनवले आहे. तर काही बीजोत्पादन कंपन्यानी शेतकऱ्यांशी बियाणे घेणे संदर्भात करार करून घेतला आहे.
कांदा बिजोत्पादनातील काही भागात कांदा गेंद बी धरू लागले आहेत. तर काही ठिकाणी परिपक्व अवस्थेत आहेत.कांदा बीजोत्पादनात मधमाशी ही महत्त्वाची भूमिका निभावत असते.
पण मधमाशांची कमी होत असणारी संख्या त्यामुळे परागीकरण कमी प्रमाणात होत आहे. त्यातच चिंतेत शेतकरी असताना बदलत्या वातावरणामुळे आणखीन त्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्याच्या बदलत्या वातावरणात किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कांदा गेंदा वर जैविक औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.
त्यामध्ये नेटारायझेम, व्हर्टीकेलीया या औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे.
त्यामुळे आळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.तर यंदा कांदा बिजोत्पादनाचा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केला असून त्याचा फायदा कसा होतोय हे पहावे लागणार आहे.