आंबा पिकला यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वाधिक बसला असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तंत्रशुद्ध पद्धतीने आंबा लागवडीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येणार आहे.
ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे आंबा द्राक्ष फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम हा उत्पादनावर झाला असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटले आहे. त्यामुळे विविध पद्धतीने नुकसान भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न करत आहेत.
त्यासाठी पुन्हा आंबा लागवड आणि ते ही योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांनी लागवडीपासूनच योग्य नियोजन केले तर भविष्यात होणारे नुकसान टळणार आहे. केवळ आंबा लागवड करायची म्हणून करायची असे न करता तंत्रशुध्द पध्दतीने लागवड केली तर उत्पादनात भर तर पडणारच आहे. पण अधिकचा नफा ही शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
राज्यातील एकूण आंबा क्षेत्र हे 4 लाख 85 हजार हेक्टर आहे.त्यातून 12 लाख टन उत्पादन मिळते. तर राज्यातील हापूस आंब्याला जगभरातून मागणी असते. पण यंदा उत्पादन घटल्यामुळे त्याचा परिणाम आंबा विक्री वर दिसू लागला आहे. आंबा लागवड करताना सुधारित संकरित जातीच्या रोपांची निवड करणे गरजेचे असते.
पारंपारिक पद्धतीमध्ये कोय कलम आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. आंबा लागवड करताना प्रथम शेतातील माती ही आंबा पिकासाठी योग्य आहे का आणि ती माती पाण्याचा निचरा होणारी आहे का हे पहावे लागते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच आंबा पिकाची वाढ होते. त्यानंतर मातीची प्रत ही किमान 1.5 ते 2 मीटर अशाच दर्जाची खोली असणे गरजेचे आहे.
तर हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज ह्या आंब्याच्या सुधारीत जाती आहेत. आंब्याची लागवड करताना 1 X 1 X 1 मी. आकाराचे खडे घेऊन त्यामध्ये 40 ते 50 किलो शेणखत + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट 2 किलो मिश्रणाने भरा.
तर आंब्याच्या झाडास एका वर्षानंतर 15 किलो कंपोस्ट खत, 150 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद 100 ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून घ्यावी लागणार आहे.दर वर्षी हे प्रमाण वाढवून 10 वर्षीनंतर आंब्याच्या प्रतेक झाडास 50 किलो कंपोस्ट खत, 1.5 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद व 1 किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे.
आंबा पिकास पाणी नियोजन हे सर्वात महत्वाचे आहे.
त्यावरच पिकाचे उत्पादन अवलंबून असते तर पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागणार आहेत.