Solar Panel : नुकत्याच काही आठवड्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लाँच केली आहे. खरेतर, या योजनेची घोषणा 22 मार्च 2024 ला अर्थातच अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त या योजनेची घोषणा केली होती.
त्यावेळी या योजनेला पंतप्रधान महोदय यांनी पीएम सूर्योदय योजना असे नाव दिले होते. मात्र, नंतर या योजनेचे नामकरण पीएम सूर्य घर मोफत योजना असे करण्यात आले. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे.
याची अंमलबजावणी देखील संपूर्ण देशभरात सुरू आहे. लोक मोठ्या प्रमाणात या योजनेत रजिस्ट्रेशन करत आहेत. या योजनेत नोंदणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या योजनेला वाढत असणारा प्रतिसाद पाहता आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच अनेकांच्या माध्यमातून जर सोलर पॅनल बसवण्याचे ठरवले तर किती किलोवॅटचा सोलर पॅनल बसवावा लागेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
किती किलोवॅटचा सोलर पॅनल बसवावा ?
आता आपण सोलर पॅनल बसवायचा असेल तर तुमच्या विजेच्या वापरानुसार किती किलोवॅटचा सोलर पॅनल बसवावा लागणार या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही दर महिन्याला 150 युनिट वीज वापरत असाल तर तुम्हाला एक किलोवॅटचा सोलर पॅनल बसवावा लागेल.
तसेच जर तुम्ही दर महिन्याला 150 ते 300 युनिट वीज खर्च करत असाल तर तुम्हाला 2 ते 3 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवावे लागतील. 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या लोकांना 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल बसवावे लागणार आहे.
किती सबसिडी मिळणार ?
तर तुम्ही सोलर पॅनल बसवण्याचा तयारीत असाल तर तुम्हाला पॅनेलच्या आकारमानानुसार व क्षमतेनुसार शासनाकडून अनुदानही दिले जात आहे. यासाठीच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत जर एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवणे
तर तीस हजार रुपये दोन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तर साठ हजार रुपये आणि तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि दहा किलो वॅट क्षमतेपर्यंतच्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.