Bhendwal Bhavishyavani 2024 : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश या विभागातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला आहे.
काल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेला या पावसामुळे मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
तथापि सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा आगामी मान्सूनवर तर विपरीत परिणाम होणार, अशी भीती शेतकऱ्यांनां आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील यंदा चांगला मानसून राहणार असा अंदाज दिला आहे.
दुसरीकडे अनेक हवामान तज्ञांनी यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे. अशातच आता जगप्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी समोर आली असून या भेंडवळच्या भाकणुकीत यंदा पाऊसमान कसा राहणार याबाबत भाकीत वर्तवण्यात आले आहे. खरतर या जगप्रसिद्ध भाकणूकीकडे राज्यातील तथा सीमावर्ती भागात असलेल्या शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. या भाकणुकीवर अनेकांचा मोठा गाढा विश्वास आहे.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेंडवळची भाकणूक वर्तवण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज सकाळी या भेंडवळच्या भाकणुकीसाठी घट मांडणी करण्यात आली होती. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली होती.
यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही घट मांडणीनंतर भाकित वर्तवण्यात आलं आहे. यावर्षी या भाकणुकीत राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत सर्व क्षेत्रातील संभाव्य घडामोडींबाबत भाकित वर्तवण्यात आले आहे. तसेच यंदाचे वर्ष शेतीसाठी कसे राहणार, पाऊसमान कसे राहणार ? याबाबत देखील भाकणुकीत महत्त्वाचा अंदाज देण्यात आला आहे. या भाकणुकीत यंदा देशाचा राजा कायम राहील असे म्हटले गेले आहे. वर्ष 2024 मध्ये पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पण, खरीप पिके साधारण राहतील असे म्हटले गेले आहे. दुसरीकडे यंदाचा रब्बी हंगाम जोमदार राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा रब्बी हंगामातील गहू पीक जोमदार येणार असा अंदाज या भाकणुकीत देण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात कमी पाऊस पडणार.
जुलैमध्ये चांगला पाऊस राहणार, ऑगस्ट महिन्यात पावसाचे तीव्रता वाढणार आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष खूपच खास ठरणार असा विश्वास यामध्ये वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण राहतील असे बोलले गेले आहे. या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव जास्त राहणार असल्याचे यामध्ये म्हटले गेले आहे यामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदाच्या भाकणुकीत राजकारणासंदर्भात भविष्यवाणी करणे टाळले गेले आहे. याचे कारण म्हणजे सध्या आचारसंहिता सुरू आहे. हेच कारण आहे की या भाकणुकीत यंदा राजकारणासंदर्भात कोणतीच भविष्यवाणी करण्यात आलेली नाही.