How To Measure Farmland : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर जेव्हा आपण नवीन जमिन किंवा प्लॉट खरेदी करतो तेव्हा त्या जमिनीची मोजणी केली जाते. जमिनीवर काही बांधकाम करायचे असेल तर त्या जमिनीचे क्षेत्रफळ नेमके किती आहे हे माहिती असणे आवश्यक आहे.
तसेच शेत जमिनीवर झाडांचे प्लांटेशन करायचे असेल, खत द्यायचे असेल तर आणि अशा विविध कामांसाठी सदर शेतजमीन नेमकी किती आहे? याची सुद्धा माहिती असणे आवश्यक असते. पण तुम्हाला तुमची शेतजमीन मोजायची असेल तर आता हे काम तुम्ही अगदी सहजतेने करू शकणार आहात.
तुमच्या मोबाईल वरूनच तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी करू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.
जमीन मोजणीसाठी प्ले स्टोअरवर तुम्हाला अनेक ऍप्लिकेशन पाहायला मिळतील. यापैकी आज आपण एका खास जमीन मोजणीच्या ॲप्लिकेशनची माहिती जाणून घेणार आहोत.
कोणते एप्लीकेशन डाउनलोड करावे लागणार
जर तुम्हाला तुमची जमीन मोजायची असेल तर यासाठी GPS Fields Area Measure हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. तसेच याचे पेड व्हर्जन देखील प्ले स्टोअर वर आहे.
म्हणजेच तुम्हाला काही अतिरिक्त फीचर्स हवे असतील तर तुम्ही पैसे भरून हे ॲप्लिकेशन खरेदी करू शकता. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये सुरुवातीला डाऊनलोड करावे लागणार आहे. एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला जीपीएस वापरण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे.
या ठिकाणी तुम्हाला जमीन मोजणीसाठी दोन पर्याय मिळतात. मॅन्युअल मेजरिंग आणि जीपीएस मेजरिंग या दोन पर्यायाचा वापर करून तुम्ही जमीन मोजणी करू शकता. जमीन मोजणी करण्यासाठी क्रियेट न्यू या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एरिया, डिस्टन्स आणि पीओआयचे ऑप्शन्स दिसतील. जमीन मोजण्यासाठी यातील एका पर्यायाची निवड करा. यात तुम्ही मॅन्युअल मेजरिंगचा वापर करून जी जमीन मोजायची आहे ती निवडा.
तसेच जीपीएस मेजरिंगचा पर्याय वापरून तुम्ही जमीन मोजणी करत असाल तर तुम्हाला त्या जमिनीवर जाऊन एका पॉईंट वरून जिथपर्यंत जमीन मोजणी करायची आहे त्या पॉईंट पर्यंत मोबाइल घेऊन चालावं लागेल आणि हे अॅप सर्व रेकॉर्ड करतं.
ही प्रोसेस केल्यानंतर मग जमिनीचे क्षेत्रफळ काढले जाते. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या जमिनीचे किंवा प्लॉटचे मोजणीचे काम पूर्ण करू शकता.
जमीन मोजणीचे इतर अन्य एप्लीकेशन
1)GPS Fields Area Measure Tool
2)Easy Area : Land Area Measure
3)Gps Area Calculator
4)GPS Land Field Area Measure