उन्हाळ्यातील पिकांना सर्वाधिक पाण्याची गरज असते. पाऊस जर सरासरीपेक्षा चांगला असेल. तर शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न मिटतो. पण उपलब्ध पाण्याचे नियोजन होणे देखील तितकेच महत्वाचे आसते.
रब्बी हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातील पिकांना लागते. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. आपल्याकडे पाण्याचा किती उपलब्ध साठा आहे.त्यावर पिकाचे कसे नियोजन केले पाहिजे. पीक प्रकार, जात आणि पीक कोणत्या हंगामात घेणार आहोत. त्याच बरोबर पीक काढणी व पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार त्या पिकाला पाण्याची असणारी गरज हे देखील पाहून पाणी नियोजन ठरवणे महत्वाचे असते.
उन्हाळी पिकाच्या पाणी नियोजनासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन फायद्याचे ठरू शकते. कारण उन्हाळ्यात पिके अतिशय संवेदनशील असतात. तर पाणी नियोजनाचा परिणाम पीक उत्पादनावर होतो. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने ऊस, भुईमूग, कांदा ही पिके घेतली जातात. उन्हाळी कांदा : कांदा पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. तर या पिकाला 13 ते 14 पाणी देण्याची गरज असते.
त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी 75 ते 80 सेंटीमीटर एवढी असावी लागते. भुईमूग : उन्हाळी भुईमूग पिकांसाठी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. तुषार पद्धतीने भुईमूग पिकांस पाणी दिल्यास 4 सें.मी. पाणी द्यावे लागते.तर प्रवाही पद्धतीने भुईमूग पिकांस प्रत्येक पाळीच्या वेळी 6 सें.मी. पाणी द्यावे. ऊस : ऊस पिकाला उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी लागते.
तर ऊस खोडव्यासाठी याच अंतराने पाणी देण्याची गरज असते. तर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याच्या याच पद्धतीवर पीक उत्पादन अवलंबून असल्याचे कृषीतज्ञ डॉ. गेठे राजेंद्र मोहन यांनी सांगितले.