House Construction Rule : प्रत्येकाचेच स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. या स्वप्नासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. खरंतर घर बांधण्यासाठी आयुष्यभर साठवलेली जमापुंजी खर्च होत असते. अनेकजण तर गृह कर्ज घेऊन घराचे काम पूर्ण करत असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही बांधलेले घर अतिक्रमणात आले तर त्याच्यावर बुलडोझर चालू शकते अन तुमचा सारा पैसा पाण्यात जाऊ शकतो.
आयुष्यभर राबराब राबून जमवलेला पैसा एका चुकीमुळे क्षणात नष्ट होऊ शकतो. यामुळे घर बांधताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. घर हायवे पासून तसेच राज्य महामार्गापासून काही ठराविक अंतरावर बांधणे अपेक्षित आहे.
यासाठी काही नियम तयार केलेले आहेत. दरम्यान आज आपण हायवे पासून किती अंतरावर घर बांधणे सुरक्षित असते, याबाबत नियम काय सांगतात याविषयी सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर रस्त्यालगत घर असणे हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे. यामुळे अनेक जण रस्त्यालगत प्लॉट घेऊन घर बांधतात. यासाठी अधिकचा पैसा देखील मोजला जातो.
मात्र रस्त्यालगत घर बांधण्याचे काही नियम आहेत जे नियम घर बांधणाऱ्याला माहिती पाहिजे. जर सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन झाले नाही तर रस्त्यालगत बांधलेल्या घरांवर बुलडोझर चालू शकते.
रस्त्यालगत घर बांधण्याचे नियम कसे आहेत?
रस्त्यालगत घर बांधण्याचे नियम नगरपालिका किंवा महापालिका ठरवत असते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सरकारच्या माध्यमातून हे नियम तयार केलेले असतात. तसेच रस्त्यालगत घर बांधण्यासाठी आधी सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
संबंधित विभागांकडून एन ओ सी प्रमाणपत्र घेतल्यानंतर घर बांधता येते. तथापि नियमानुसार, महामार्गालगत घर बांधायचे असेल तर 75 फूट जागा सोडून घर बांधावे लागते.
कोणत्याही खुल्या किंवा कृषी क्षेत्रामध्ये, राष्ट्रीय किंवा प्रांतीय महामार्गावरील कोणत्याही रस्त्याच्या मध्य रेषेपासून 75 फूट अंतरापूर्वी कोणतेही बांधकाम केले जाऊ नये असा नियम आहे. तर शहरी भागात हे अंतर 60 फुट असे ठरवण्यात आले आहे.
कोणत्याही महामार्गाच्या मध्यापासून 40 मीटर अंतरावर बांधलेले कोणतेही बांधकाम बेकायदेशीर मानले जाते आणि ते कधीही पाडले जाऊ शकते. 40-75 मीटरच्या परिघात बांधकामासाठी प्रथम NHAI कडून परवानगी घ्यावी लागते.
गावात रस्त्यालगत घर बांधण्याचे नियम
ज्या गावांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे, त्याठिकाणी रस्त्यालगत घर बांधण्याचे नियम तयार केलेले आहे. या नियमानुसार जर एखाद्याला रस्त्यालगत असणारे जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम करायचे असेल तर त्याने शासनाच्या नियमानुसार रस्त्यापासून किमान ३ मीटर अंतर सोडणे आवश्यक आहे.