Home Loan Tips : अलीकडे घर घेणे मोठे आव्हानात्मक बनले आहे. कारण की, घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अनेकजण घर खरेदीसाठी गृह कर्ज घेतात. विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सर्वसामान्यांना गृह कर्ज घेऊन आपल्या घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला देत आहेत.
दरम्यान, जर तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे.
कारण की, आज आपण तुमच्या उत्पन्नानुसार होम लोनचा किती हफ्ता असला पाहिजे याविषयी तज्ञ लोकांनी दिलेला सल्ला जाणून घेणार आहोत.
गृहकर्जाच्या ईएमआयबाबत लोकांमध्ये खूपच संभ्रम पाहायला मिळतो. गृह कर्जासाठी किती EMI ठेवणे योग्य आहे ? असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
होम लोनचा मासिक हप्ता कितीचा असला पाहिजे ?
तुमच्या उत्पन्नानुसार गृह कर्जाचा किती EMI ठेवला पाहिजे ? याबद्दल, तज्ञांचे मत आहे की तुमचा ईएमआय तुमच्या एकूण पगाराच्या म्हणजे टोटल टेक होम सॅलरीच्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
समजा सध्याचा तुमचा पगार अर्थातच बँक खात्यात येणारा पगार जर 1 लाख रुपये असेल तर तुमचा ईएमआय 35 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा.
तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असले तरी ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. असे केल्यास तुम्ही तुमच्या इतर गरजा देखील पूर्ण करू शकणार आहात.
पगार वाढला तर EMI वाढवावा का ?
अनेकांच्या माध्यमातून जर आमचा पगार वाढला तर ईएमआय वाढवावा का असा प्रश्न उपस्थित केला जातो. जर ईएमआयचा हप्ता वाढवला तर गृहकर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळेल असे सर्वसामान्यांना वाटते.
मात्र तज्ञ याची शिफारस करत नाहीत. तज्ञ लोकांच्या मते, तुम्हाला गृहकर्जावर सरासरी 6-7% व्याज द्यावे लागते, परंतु जर तुम्ही तुमचा वाढलेला पगार जर म्युचुअल फंड मधील एखाद्या चांगल्या फंडात गुंतवला तर तुम्हाला 12-14% पर्यंत परतावा मिळू शकतो.
मात्र असे असले तरी, Mutual Fund सारख्या रिस्की ठिकाणी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यामुळे याची काळजी मात्र नागरिकांनी घ्यायची आहे.