Home Loan Interest Rate : आपल्यापैकी अनेकांचे घरांचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नसेल. या स्वप्नासाठी आपल्यापैकी अनेकजण अहोरात्र काबाडकष्ट करत असतील. जर तुम्हीही गृह खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
खरे तर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता गृह खरेदीसाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील गृह कर्ज घेऊन गृह खरेदीचा सल्ला देऊ लागले आहेत.
मात्र गृह कर्ज घेताना बँकांचे व्याजदर तपासले पाहिजे. भारतातील सर्वच बँका गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. मात्र ज्या बँका सर्वात कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत असतील त्यांच्याकडूनच हे कर्ज घेतले पाहिजे असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण देशातील अशा बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे की कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोणत्या बँका कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देतात ?
बँक ऑफ इंडिया : पैसाबाजार डॉट कॉमनुसार बँक ऑफ इंडिया ही बँक सर्वात कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. या बँकेकडून तीस वर्षांच्या कालावधीसाठी प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 90% पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
बँकेकडून हे कर्ज 8.30% एवढ्या किमान व्याजदरात उपलब्ध होत आहे. मात्र गृह कर्जासाठीचे व्याजदर हे सिबिल स्कोर आणि इतर काही घटकांवर अवलंबून राहणार आहे.
HDFC Bank : एचडीएफसी ही भारतातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी कमी इंटरेस्ट रेटमध्ये होम लोन उपलब्ध करून देत आहे. या बँकेकडून 30 लाखांपासून ते 75 लाखांपर्यंतचे होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी बँकेकडून 8.35% एवढे किमान व्याजदर आकारले जात आहे.
Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बँकेकडून 8.40% पासून ते 10.60% एवढ्या व्याजदरात गृह कर्ज पुरवले जात आहे.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी पीएसबी आहे. या प्रमुख पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त व्याजदरात गृह कर्ज पुरवले जात आहे.
ही बँक फक्त 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. विशेष बाब अशी की महिला अर्जदाराला गृहकर्जावर 0.05% टक्के एवढी सूट देखील दिली जात आहे.