पत्नीसोबत जॉईंट होमलोन घेतलं तर मिळतात ‘हे’ भन्नाट फायदे ! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Benifits : आपल्यापैकी अनेकांचे नवीन घर बनवण्याचे स्वप्न असेल. काहींचे नवीन घराचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नांसाठी झगडत असतील. खरंतर, वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे आता अवघड वाटू लागले आहे.

मात्र घर बनवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. त्यामुळे अनेकजण होमलोन घेऊन स्वप्नातील घर बांधतात. मात्र, होम लोन घेताना अनेकजण फक्त व्याजदर चेक करतात. ज्या बँका कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यांच्याकडून होम लोन घेतले जाते.

पण ग्राहकांनी ज्या बँका कमी व्याजदर देत आहेत त्यांच्याकडून तर कर्ज घेतलंच पाहिजे शिवाय कर्ज घेताना त्यांनी जॉईंट होम लोन घेतले पाहिजे. जॉईंट होम लोन घेतल्यास ग्राहकांना विविध फायदे मिळतात.

यामुळे त्यांना स्वस्तात होम लोन मिळते. जर ग्राहकांनी पत्नीसोबत जॉईंट होम लोन घेतले तर त्यांना व्याजदर देखील सवलत मिळू शकते. याशिवाय जॉईंट होम लोनचे इतरही अनेक फायदे आहेत, आज आपण हेच फायदे तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जॉईंट होम लोनचे फायदे

अधिक कर्ज मिळणार : कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि उत्पन्नाचा स्रोत पाहतात. अनेकदा कर्जाची रक्कम अधिक असल्यास, पगार कमी असल्यास किंवा कमकुवत क्रेडिट स्कोअर असल्यास बँकाच्या माध्यमातून कर्ज देण्यास नकार दाखवला जातो. अशा परिस्थितीत, जॉईंट होम लोन उपयुक्त पडते.

जर तुम्हाला चांगला पगार आणि मजबूत क्रेडिट स्कोअर असलेल्या सह-अर्जदाराची मदत मिळाली, तर सहजतेने होम लोन मिळू शकते. जॉईंट होम लोन घेण्याचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे. जर जॉईंट होम लोन घेणाऱ्या सह अर्जदाराचा उत्पन्नाचा स्रोत चांगला असेल आणि त्याचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर अधिकचे होम लोन देखील मंजूर होऊ शकते. अर्थातच जॉईंट होम लोन घेतल्यास लोनची रक्कम वाढू शकते.

कर बचतीत मिळतो दुहेरी फायदा : गृहकर्जावर दोन प्रकारचे कर लाभ मिळतात. मूळ रकमेच्या परतफेडीवर कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ उपलब्ध आहे. व्याज परतफेडीवर 2 लाख रुपयांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे. संयुक्त कर्ज घेतल्याने, दोघांनाही लाभ मिळतो, तथापि, यासाठी सह-कर्जदार देखील खरेदी केलेल्या मालमत्तेचा सह-मालक असावा.

असे नसल्यास, तो कर सवलती घेऊ शकत नाही. EMI भरण्यात भागीदार असूनही, त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. यामुळे घर खरेदी करताना पती आणि पत्नी दोघांच्या नावे घर खरेदी केले पाहिजे आणि जॉईंट होम लोन देखील पती आणि पत्नी दोघांनी घेतले पाहिजे, असे केल्यास कर बचतीत दुहेरी फायदा मिळणार आहे.

व्याज कमी लागत : जर जॉईंट होम लोन मध्ये सह अर्जदार महिला असेल तर व्याजदरात सवलत मिळते. यामुळे जॉईंट होम लोन घेताना सह अर्जदार नेहमी पत्नी किंवा घरातील इतर महिला सदस्य असाव्यात. यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात होम लोन मिळू शकणार आहे. मात्र यासाठी जॉईंट होम लोन मध्ये सह अर्जदार असलेली महिला घराची को-ओनर देखील असली पाहिजे.

मुद्रांक शुल्क कमी लागत : जर तुम्हाला स्वस्तात होम लोन मिळवायचे असेल तर घर हे महिलाच्या नावे खरेदी केले पाहिजे. घराची नोंदणी महिलेच्या नावावर असल्यास किंवा संयुक्त मालकी असल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळते. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असते. आपल्या राज्यात जर एखाद्या महिलेच्या नावावर घराची खरेदी झाली असेल किंवा तीचे नाव मालकी हक्कात असेल तर 1-2 टक्के सवलत मिळु शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा