Home Loan Benefits : अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढलेली महागाई, वाढलेले इंधनाचे दर आणि बिल्डिंग मटेरियलचे सातत्याने वाढत असलेले भाव या सर्व पार्श्वभूमीवर आता स्वप्नातील घर बनवणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशीच गत झाली आहे.
परिणामी अलीकडे घर बनवण्यासाठी गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. खरंतर आपल्या भारतीय संस्कृतीत कर्ज घेणे कधीही योग्य मानले गेलेले नाही. मात्र अलीकडे आपल्या संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे.
ज्याप्रमाणे जगातील इतर संस्कृतीत बदल झाला आहे तसाच भारतीय संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता कर्ज घेणे वाईट मानले जात नाही. विशेषता स्वप्नातील घरांसाठी कर्ज घेणे आता वाईट मानले जात नाही. रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक आता कर्ज काढून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला देताना दिसतात.
याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे भविष्यात घर घेणे आणखी महाग होणार आहे. अशा स्थितीत जर आत्ताच कर्ज काढून घर बनवले तर ते योग्य ठरेल असे मत काही लोकांकडून व्यक्त होत आहे.
हेच कारण आहे की गेल्या काही दशकांमध्ये गृह कर्ज घेऊन घर उभारणार यांची संख्या वाढली आहे. वास्तविक कोणतेही कर्ज घेतले तर त्यासाठी व्याज द्यावे लागते. यामुळे कर्ज घेणे अनेकदा चुकीचे मानले गेले आहे. पण जेव्हा होम लोनचा विषय येतो तेव्हा गृह कर्जाचे काही फायदे देखील सांगितले जातात.
म्हणजेच गृह कर्ज घेऊन घर बांधणे फक्त तोट्याचेच ठरते असे नाही तर यातून नागरिकांना काही फायदे देखील मिळतात. आज आपण याच फायद्यांबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
होम लोन घेण्याचे काय फायदे आहेत ?
टॅक्स मध्ये बचत होते : जर तुम्ही होम लोन घेण्याच्या विचारात असाल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, होमलोन घेतल्याने टॅक्समध्ये बचत होते. तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे होम लोनच्या मूळ रकमेवर दीड लाखांपर्यंत तसेच होम लोनच्या व्याजावरील रकमेवर दोन लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळते.
मात्र ज्या घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशाच घरासाठी घेतलेल्या होम लोनवर ही सूट पुरवली जाते. ज्या घरांचे बांधकाम सुरू असते म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन काम असते अशा घरांसाठी घेतलेल्या होम लोन वर टॅक्स मध्ये सूट मिळत नाही.
प्री पेमेंट वर शुल्क लागत नाही : होम लोनचा हा एक मोठा फायदा आहे. तुम्ही इतर कोणत्याही प्रकाराचे कर्ज घेतले आणि ते कर्ज फेडताना प्री पेमेंट करत असाल तर तुम्हाला शुल्क द्यावे लागते. परंतु होम लोन बाबत असं घडत नाही. होम लोनसाठी तुम्ही जर प्री पेमेंट करणार असाल तर यासाठी तुम्हाला कोणतेच शुल्क द्यावे लागत नाही.
प्रॉपर्टीची वैधता चेक होते : होम लोनचा हा फायदा कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तज्ञ लोक सांगतात की, होम लोन घेतले असेल तर तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करत आहात ती प्रॉपर्टी योग्य आहे की नाही याची वैधता ऑटोमॅटिक चेक होते.
खरंतर बँका होम लोन देताना प्रॉपर्टी ची सर्व माहिती घेतात. कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाही हे चेक केले जाते. प्रॉपर्टी कायदेशीर आहे का, त्याचे टायटल ट्रान्सफर योग्य झाले आहे का, सदर प्रॉपर्टी बाबत न्यायालयात काही वाद तर नाही ना अशा अनेक बाबी चेक होतात. यामुळे होम लोन घेणे काही प्रसंगी फायद्याचे ठरते.
होम लोनचा रिपेमेंट कालावधी अधिक : हा पण एक महत्त्वाचा फायदा आहे. तुम्ही जर गृह कर्ज घेत असाल तर तुम्हाला रिपेमेंट कालावधी अधिक मिळतो. होम लोनचा कालावधी हा तब्बल 30 वर्षांपर्यंत असू शकतो. यामुळे साहजिकच ईएमआय अर्थातच मासिक हप्ता कमी येतो. यामुळे होम लोनची परतफेड सहज होते.