Home Loan Benefits : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे, हक्काचे एक घर असावे असे स्वप्न असेल. पण घरांच्या वाढलेल्या किमती पाहता हे स्वप्न पूर्ण करताना आपल्याला अडचण येत असेल आणि तुम्ही घरासाठी होम लोन घेण्याच्या विचारत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरंतर गेल्या काही दशकात घरांच्या किमती खूप वाढले आहेत.
आगामी काळात घरांच्या किमती आणखी वाढणार आहेत. वाढती महागाई आणि बिल्डिंग मटेरियलचे वाढत असलेले दर यामुळे घरांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत होत आहे. पुढल्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून सिमेंटच्या दरात प्रति बॅग 50 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सध्या सिमेंटची बॅग 350 रुपयाला मिळत आहे मात्र ही सिमेंट बॅग आता पुढील महिन्यापासून चारशे रुपयांपर्यंत खरेदी करावी लागणार आहे.
त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महाग होणार आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य लोक आपले हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करतात. अशा स्थितीत जर तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर थांबा ! आजची ही बातमी संपूर्ण वाचा आणि मग होम लोन घेण्याचा विचार करा.
खरंतर होम लोन घेणं हे काही प्रसंगी फायद्याचे ठरते. पण होम लोनवर आकारले जाणारे व्याजदर अधिक असल्याने होम लोन घेणे अनेकांना आवडत नाही. पण जर तुम्ही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला व्याजदरात सूट मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या किंवा तुमच्या आईच्या नावाने घर खरेदी केले पाहिजे.
कारण की महिलांना होम लोनवर असलेल्या व्याजदरात तर सूट मिळतेच शिवाय इतरही अनेक फायदे दिले जातात. दरम्यान आज आपण या फायद्याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
इंटरेस्ट रेट मध्ये मिळते मोठी सूट
देशातील अनेक बँका आणि नॉन-बँक वित्तीय संस्था (NBFCs) नागरिकांना होम लोन पुरवतात. पण या वित्तीय संस्था महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देत असतात. जाणकार लोकांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना अर्धा ते एक टक्के स्वस्त व्याजदरात होम लोन मिळते. यामुळे जर तुम्ही तुमचा आईच्या नावावर किंवा पत्नीच्या नावावर घर खरेदी केले तर तुम्हाला व्याजदरात सवलत मिळू शकते. किंवा मग तुम्ही तुमच्या पत्नीला सहअर्जदार बनवूनही स्वस्त व्याजदरात गृहकर्ज घेऊ शकता.
आयकरमध्ये मोठी सूट मिळते
जाणकार लोकांच्या मते महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास होम लोन वरील व्याजदरात सवलत मिळते शिवाय आयकर कायदा कलम 80C अंतर्गत एकूण होम लोनपैकी दीड लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवरील करात देखील सूट मिळते. जर समजा तुम्ही तयार घर घेत असाल तर यासाठीच्या होम लोनवरील व्याजासाठी आकारल्या जाणाऱ्या करात सुद्धा दोन लाखांपर्यंतची सूट मिळते.
व्याजावर अनुदान देखील मिळते
जर तुम्ही तुमच्या आईच्या किंवा पत्नीच्या नावावर घरासाठी होम लोन घेतले तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला अडीच लाखांपर्यंतचे व्याज अनुदान मिळू शकते. किंवा तुम्ही तुमच्या पत्नीला सह अर्जदार बनवून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.