Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाचा लहरीपणा अनुभवायला मिळाला. वेळेआधीच मान्सून आगमन झाल्यानंतर सुद्धा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे शेतकरी अगदीच चिंतेत सापडले होते. पण जुलै मध्ये चांगला पाऊस होणार असे IMD ने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले होते. यानुसार आता जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
जुलैचा पहिला आठवडा कोरडा राहिल्यानंतर आता राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सारख्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ज्या मुसळधार पावसाच्या आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या पावसाची प्रतीक्षा आता संपली आहे.
पण, आता गुजरातसह केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्राकडे रवाना झाला आहे. याचा परिणाम म्हणून पावसाचा जोर काहीसा कमी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि, आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कुठं बरसणार जोरदार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज अन उद्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, अन कोकणात पावसाची शक्यता आहे. आज अन उद्या उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक अन अहमदनगर येथे पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात आज चांगला पाऊस होणार असे म्हटले गेले आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात पावसाची शक्यता आहे. कोकणात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबईत आज अन उद्या अधूनमधून पाऊस पडणार अशी शक्यता आहे. तसेच, पालघर वगळता उर्वरित कोकणात मुसळधार पाऊस हजेरी लावणार असे बोलले जात आहे.