Farmer succes story : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर केला जात आहे.
सुरुवातीच्या काळात यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी भरीव वाढ झाली मात्र कालांतराने यामुळे जमिनीचा पोत खालावला गेला शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यामुळे आता मोठी घट घडत असल्याचा धक्कादायक अहवाल आता अनेक संशोधनाअंती समोर आला आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना रासायनिक खतांना फाटा देण्याची आवश्यकता असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक आपले मत व्यक्त करतात.
कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी आता सेंद्रिय शेती (Organic Farming) करणे काळाची गरज बनली आहे. देशातील अनेक शेतकरी बांधव आता रासायनिक खतांचा दुष्परिणाम पाहता सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer) वापर करून सेंद्रिय शेती करू लागले आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न देखील मिळू लागले आहे. याशिवाय मानवाचे तसेच काळ्याआईचे आरोग्य देखील अबाधित राहत आहे.
उत्तर प्रदेश राज्याच्या (Uttar Pradesh) मेरठमधील एका अवलिया शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीची आवश्यकता ओळखून गांडूळ खत निर्मिती (Vermicompost) करण्यास सुरुवात केली.
आज हा अवलिया केवळ गांडूळ खत विक्रीतून सालाना एक करोड रुपयांची कमाई करत आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या अवलियाच्या यशोगाथेविषयी.
कोण आहे हा अवलिया शेतकरी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील रहिवासी असलेला अमित त्यागी यांनी गांडूळ खत विक्रीतून एक कोटी रुपये वार्षिक कमवण्याची किमया साधली आहे.
विशेष म्हणजे अमित यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर अमित यांनी अनेक वर्षे मल्टिनॅशनल कंपनीत काम देखील केले.
मात्र नोकरी करताना अमित यांचे मन काही रमेना. मग काय अमित यांनी जरा हटके करण्याचा विचार केला आणि गांडूळ खत बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
हा शेतीपूरक व्यवसाय अमित यांच्यासाठी मोठा फायदेशीर ठरला असून आता ते गांडूळ खत विक्रीतून चांगला बक्कळ पैसा कमवीत आहेत.
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, ओडिशा, आसामसह 14 राज्यांमध्ये त्यांची आठ हजारांहून अधिक युनिट्स आहेत
जिथे ते गांडूळ खत बनवतात आणि मार्केटिंग करतात. अमित यांच्या मते, त्यांची वार्षिक उलाढाल ही जवळपास 1 कोटी रुपये आहे.
49 वर्षीय अमित यांची पत्नी देखील उच्चशिक्षित आहे. त्यांच्या पत्नीने देखील अमित प्रमाणेच एमबीएचे शिक्षण घेतले आहे. अमित यांना एका कार्यशाळेत वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती मिळाली.
यानंतर अमित यांनी मोठी शोधाशोध केली आणि गांडूळ खत बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी अमित यांना व्यवसायात कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे सुरवातीला त्यांनी थोड्या प्रमाणात गांडूळ खत तयार करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला अमित यांनी तयार केलेले गांडूळ खत एका नर्सरी चालवणाऱ्या माणसाला विकला. अमित यांनी पाठवलेले गांडूळ खत अतिशय उत्तम असल्याने आठवडाभरानंतर पुन्हा त्या नर्सरी चालकाने गांडूळ खताची दुसऱ्यांदा मागणी केली.
मात्र अमित पिवर बिझनेसमॅन माणूस त्यांनी त्या नर्सरी चालकाला खत तयार नाही म्हणून सांगितले आणि हा युक्तिवाद करून गांडूळ खत त्यावेळी तब्बल 10 रुपये किलो प्रमाणे त्या नर्सरी चालकाला विकले.
मित्रांनो त्यावेळी खताची किंमत फक्त 50 पैसे प्रतिकिलो होती. विशेष म्हणजे त्या संबंधित नर्सरी चालकाला अमित यांनी पाठवलेले गांडूळखत विशेष आवडल्याने त्याने ते 10 रुपये किलोने विकत घेण्याचे मान्य देखील केले. तेव्हा अमित यांच्या लक्षात आले की, हे काम मोठ्या प्रमाणावर करायला काही हरकत नाही.
महिन्याला 100 टन पेक्षा जास्त वर्मी कंपोस्टचे उत्पादन अमित सांगतात की, ज्यावेळी त्यांनी गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला तेव्हा फार कमी लोक सेंद्रिय शेती करायचे.
यामुळे सुरुवातीच्या काळात अमित यांना वर्मी कंपोस्टच्या मार्केटिंगबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सुरुवातीला सेंद्रिय शेती पद्धतीमुळे आपले उत्पन्न कमी होईल असे शेतकरी लोकांना वाटले.
यानंतर अमितने गावोगावी जाऊन शेतकरी लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली. तो रोज कुठल्या ना कुठल्या गावात जाऊन चौपाल टाकून लोकांना गांडूळ कंपोस्टबद्दल माहिती देत असे.
अशा प्रकारे हळूहळू लोक सेंद्रिय शेती करू लागले आणि अमित सोबत जोडले गेले. अमित यांनी एकट्या मेरठमध्येच 300 हून अधिक वर्मी कंपोस्ट बेड स्थापित केले आहेत.
दर महिन्याला ते 100 टनांहून अधिक गांडूळखत तयार करत आहेत. याशिवाय ते जीवित गांडुळांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत. निश्चितच अमित यांनी मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे सिद्ध होणार आहे.