पुण्यात पाऊस पडणार का, भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट राहणार का ? हवामान खात्याने स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : सध्या भारतासहित संपूर्ण जगात क्रिकेट विश्वचषकाचा थरार पाहायला मिळत आहे. चार वर्षानंतर होणारा क्रिकेट वर्ल्डकप सध्या मोठ्या रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. जगातील टॉप 10 क्रिकेट टीम विश्वचषकात आपला जोहर दाखवत आहेत. दरम्यान क्रिकेट विश्वचषकाचा आज अर्थातच 19 ऑक्टोबर 2023 रोजी भारत बनाम बांगलादेश हा सामना रंगणार आहे.

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वास्तविक भारताने या विश्वचषकात आपले सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. सुरुवातीला बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवले, यानंतर अफगाणिस्तानला लोळवले आणि मग कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत भारताने तब्बल सहा गुणांची कमाई केली आहे. आज भारत आपला चौथा सामना खेळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच या सामान्यबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे काळे ढग गर्दी करत आहेत. कारण की काल अर्थातच 18 ऑक्टोबरला पुण्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील क्रिकेट स्टेडियमवर देखील काल हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आज देखील पुण्यात पाऊस पडणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

म्हणून क्रिकेट प्रेमींकडून आजच्या सामन्यात पाऊस पडणार का, आज पुण्यातील हवामानावर बाबत भारतीय हवामान खात्याने काय माहिती दिली आहे याविषयी विचारणा केली जात आहे. यामुळे आता आपण आज पुण्यातील हवामान कसे राहणार, पुण्यात पाऊस पडणार का याबाबत IMD ने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजाबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार आजच हवामान ?

हवामान खात्याने आज पुण्यातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सदर माहितीनुसार आज म्हणजे १९ ऑक्टोबरला पुणे शहरात काळे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. पण क्रिकेट प्रेमींनी चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण की, आज पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे.

IMD ने म्हटल्याप्रमाणे, आज पुण्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तसेच आज ताशी ११ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु आज पुण्यात पाऊस पडणार नाही असे सांगितले गेले आहे. यामुळे आजचा भारत बनाम बांगलादेश हा क्रिकेट सामना व्यवस्थित रित्या पार पडेल असा आशावाद व्यक्त होत आहे.