Havaman Andaj : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने मान्सूनोत्तर मनसोक्त बॅटिंग केली आहे. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यासह देशातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या महिन्यात राज्यातील काही भागात तर गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष बाब म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्याची सुरुवातही अवकाळी पावसाने झाली.
मान्सून काळात सरासरीपेक्षा जवळपास 12% कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील शेती पिकांच्या उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे मान्सून काळात झालेल्या कमी पावसामुळे याचा रब्बी हंगामावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
पण, आता गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीला झालेला अवकाळी पाऊस हा शेतीपिकांसाठी घातक ठरत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे.
पण, अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आता पूर्णपणे निवळले असले तरीही राज्यासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
तर काही भागात थंडीची तीव्रता वाढणार असे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे आगामी चार-पाच दिवसात तापमानात घसरण होणार आहे आणि थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे.
कुठं बरसणार पाऊस ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
राज्यातील कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रसोबतच देशातील दक्षिणेकडील भागांमध्ये ही मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात आज हलका ते माध्यम पाऊस हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. लक्षद्वीपमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.