महाराष्ट्रात कस राहणार पुढील पाच दिवसाच हवामान ? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : सध्या संपूर्ण भारतात काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. तामिळनाडू सह देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तामिळनाडू मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तेथे अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे तामिळनाडूमध्ये आगामी काही दिवस असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे तेथील जनतेची  चिंता पूर्णपणे मिटलेली नाही. दुसरीकडे जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होत आहे.

याचा परिणाम म्हणून देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तरेकडील जवळपास सर्वच राज्यात थंडीची लाट आली आहे. तसेच उत्तरेकडून थंड वारे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने झेपावत आहेत. याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट आली आहे.

विशेष म्हणजे या विभागात कमाल तापमानही कमी झाले आहे. परिणाम म्हणून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. तिथे जोरदार थंडीला सुरुवात झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवस महाराष्ट्रात कस हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती आहे.

काय म्हणतय हवामान विभाग

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडत असल्याने याचा प्रभाव म्हणून आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस गारठा कायम राहणार आहे. राज्यावर सध्या कोणतीच हवामान प्रणाली सक्रिय नाही, यामुळे आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार नाही.

राज्यात आता हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आगामी पाच दिवस गारठा कायम राहणार आहे तर दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या भागात थंडीचा जोर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत थोडासा कमी राहणार आहे. तथापि आगामी पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि काही भागात थंडीचा जोर वाढेल असे सांगितले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा