सावधान ! नागपूरात ढगफुटीमुळे दानाफान, आणखी ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर नागपूर येथे ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. यामुळे नागपूर शहरात सर्वत्र दाणाफान पाहायला मिळाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल राज्यातील विदर्भ, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस झाला. नागपूर मध्ये तर ढगफुटी सारखा पाऊस झाला असल्याने रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष म्हणजे हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने आज राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आज राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण मुंबईसह संपूर्ण कोकणात आज मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने आज राज्यातील नागपूर आणि रायगड या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जनासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय 25 आहे 26 सप्टेंबरला राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याने उद्यापासून 26 सप्टेंबर पर्यंत राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे.