हवामानात पुन्हा मोठा चेंज ! पुढील चार दिवस ‘या’ भागांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा गंभीर ईशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रसहित देशातील विविध भागांमधून मान्सून परतला आहे. नैऋत्य मोसमी वारे देशातून परतले आहेत. मान्सून माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासहित देशातील विविध भागात ऑक्टोबर हिटचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. आपल्या राज्यातही विविध भागांमध्ये ऑक्टोबर हिट मुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात थोडीशी घट आली आहे. तापमानाचा पारा घसरला असल्याने थंडीची चाहूल लागत आहे. हवामान खात्याने देखील आगामी काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे तर दुसरीकडे देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळामुळे आणि बंगालच्या खाडीत तयार झालेल्या हामून चक्रीवादळामुळे देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. अशातच काल अर्थातच 26 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय हवामान खात्याने एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.

यानुसार देशातील काही राज्यात आगामी चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण भारतातील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. पण उर्वरित राज्यांमध्ये पुढील पाच दिवस हवामानात फारसा बदल होणार नाहीये.

कोणत्या राज्यात बरसणार मुसळधार पाऊस?

IMD ने जारी केलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागात आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे. या संबंधित भागांमध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

तसेच किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात २९ आणि ३० ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता यावेळी IMD च्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे 29-30 ऑक्टोबर रोजी अतिशय मुसळधार असा पाऊस पडणार अशी शक्यता आहे.

यामुळे या संबंधित राज्यांमधील नागरिकांना अधिक सावध आणि सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण महाराष्ट्रात या कालावधीत पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली असून आगामी काही दिवसात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात थंडीची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे.