Havaman Andaj 2024 : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. काल मान्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. परंतु आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती आहे. यामुळे आगामी तीन-चार दिवसात मान्सून राज्यासहित देशातील अनेक भागात प्रगती करणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय झाला असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. काल राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला. नाशिकमध्येही पावसाची हजेरी लागली. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पावसाची वाट पाहिली जात होती. काही भागात पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
यामुळे या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पावसा संदर्भात विचारणा केली जात होती. अखेर कार गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे तर काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे.
दरम्यान येत्या काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आगामी चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असाही अंदाज हवामान खात्याचा माध्यमातून समोर येत आहे.
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येथे अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज आहे. यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी मात्र येलो अलर्ट देण्यात आला आहे.
संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, उर्वरित कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आय एम डी ने उद्याही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
उद्या अर्थातच 23 जूनला राज्यातील दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यासाठी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांना, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर, नाशिक, पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.