हरभरा पिकाला केव्हा-केव्हा पाणी दिलं पाहिजे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Harbhra Lagwad : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या दोन मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. आपल्या राज्यात या दोन्ही पिकांचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासहित जवळपास सर्वच महाराष्ट्रात या दोन्ही पिकांची लागवड केली जाते. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून हरभरा पिकाला केव्हा-केव्हा पाणी दिले पाहिजे याबाबत विचारणा केली जात होती.

यामुळे आज आपण हरभरा पिकाला केव्हा पाणी दिले पाहिजे, या पिकाला कोणत्या अवस्थेत पाणी दिले तर चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येऊ शकते, याविषयी कृषी तज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहिती बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हरभरा पिकाला कोणत्या अवस्थेत पाणी दिले पाहिजे

हरभरा पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन हा घटक खूपच महत्त्वाची भूमिका निभावतो. पाण्याला हे पीक खूपच संवेदनशील आहे. यामुळे जमिनीच्या पोतनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे लागते.

कृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जिरायती भागात जर हरभरा पिकाची लागवड केली असेल आणि फक्त एकच पाणी फिरवता येणार एवढे पाणी उपलब्ध असेल तर हरभरा पिकाला फुलधारणा झाल्यानंतर म्हणजेच पिकाला फुले आल्यानंतर एक पाणी देणे आवश्यक असते.

तसेच कृषी तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर मध्यम जमिनीत हरभरा पिकाची लागवड करण्यात आली असेल तर पीक लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.

तसेच भारी जमिनीकरीता पाण्याच्या दोन पाळ्या दिल्यात तरीदेखील चांगले उत्पादन मिळू शकते. भारी जमिनीत हरभरा पिकाची लागवड केलेली असेल आणि दोन पाणी देण्याची सोय असेल तर पहिले पाणी हे ३०-३५ दिवसांनी व दुसऱ्यांदा ६०- ६५ दिवसांनी पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हरभरा पिकाला योग्य प्रमाणात पाणी द्यावे. अधिकचे पाणी दिले तर पीक खराब होऊ शकते. तसेच हरभरा लागवड केलेल्या शेतात खूप मोठ्या भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. म्हणजेच पाण्याचा जास्त ताण देणे पिकासाठी घातक ठरू शकते.

कृषी तज्ञ सांगतात की, हरभरा पिकाला जर एक पाणी दिले तर 30 टक्के दोन पाणी दिले तर 60 टक्के आणि जर तीनदा पाणी दिले तर उत्पादनात दुपटीने वाढ होत असते. हरभरा पीक फुलोऱ्यात असताना पिकाला पाणी देणे आवश्यक असते. जर या परिस्थितीमध्ये पिकास पाण्याचा ताण जाणवत असेल तर ताबडतोब पाणी दिले पाहिजे.

पण जर या अवस्थेत शेतकऱ्यांकडे पाणी देण्यासाठी पाण्याची सोय नसेल तर शेतकऱ्यांनी २ टक्के युरीयाची पहिली फवारणी आणि त्यानंतर घाट्यात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा