कोकणच्या हापूस आंब्याला देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. हापूस आंब्याची चव चाखण्याची भुरळ अनेकांच्या मनात असते. तर आता अमेरिकापाठोपाठ जपान मधील नागरिकांनाही हापूस खाण्याचा मोह आवरत नाही.
म्हणून आंब्याच्या मागणीत वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते.त्याच बरोबर गुजरातमधील जुनागढ येथे देखील आंब्याची उत्पादन घेतले जाते. जपानमध्ये निर्यात करण्यात येणाऱ्या आंब्याची अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून हापुस आणि केशर आंब्याची निर्यात केली जात आहे.
दरवर्षी देशातून 400 कोटी रुपयांचा आंबा निर्यातीसाठी पाठवला जातो. यामध्ये देशातून सर्वाधिक आंब्याची निर्यात ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते. त्याच बरोबर अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबिया, हाँगकाँग, इटली आणि स्वित्झर्लंड इत्यादी देशांतही आंब्याची निर्यात केली जाते.
यंदाच्या वर्षी जपानमध्ये आंब्याच्या निर्यातीची पहिली खेप पोहोचली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टोकियो येथे एक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विविध स्टॉलमध्ये आंब्याचे प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.