फळांचा राजा बाजारात कधी येईल आणि आपण तो कधी खरेदी करतोय अशी अवस्था अनेकांची झाली आहे.मात्र कोकणच्या हापूस बरोबरच कर्नाटकच्या हापूस देखील बाजारात आला आहे.
कोकण हापूस आणि कर्नाटकी हापूस ह्या दोन्हीत प्रति डझन 200 रुपयांचा फरक असल्याचे व्यापारी सांगतात. तर काही ठिकाणी कोकणी हापूस म्हणून त्याच भावात कर्नाटकचा हापूस विकला जातोय त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.
ह्या वर्षी कोकणी हापूसची स्पर्धा करू पाहणार्या कर्नाटकच्या हापूस आंब्याची किंमत स्वस्त असल्यामुळे ग्राहक त्या आंब्याला पसंती देतील अशी शक्यता दिसत आहे.
तर या दोन आंब्यामध्ये जास्त फरक नसल्याचे व्यापारी सांगतात. असे असले तरी कोकणी हापूस हा कर्नाटक हापूस आंबा पेक्षा खूप आकर्षक व चविष्ट आहे.
कर्नाटकचा कमी दराचा हापुस हा जास्त दराचा कोकणी हापूस म्हणून विकला जातोय .कर्नाटक आंबा व्यापारी कोकण आणि कर्नाटक आंब्यात फारसा फरक नसल्याचे भासवत आहेत.
तर गेल्या वर्षभरात कोकण हापूस च्या नावाने कर्नाटकी हापूस जास्त दराने विकून फसवणूक झाली आहे. त्यासंदर्भात यावेळी व्यापाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे.
सध्या आंबा नुकताच बाजारात आल्यामुळे त्याची दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. एकट्या मुंबईच्या APMC मार्केटमध्ये प्रतिदिन हजाराहून अधिक आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत.
तर फेब्रुवारी महिन्यात 6 हजाराहून अधिक आंब्याच्या पेट्यांची महिना अखेरीस बाजारात आवक झाली होती.
मुंबई कृषी उत्पन्न समिती मध्ये महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कोकणी हापूस 1556 तर कर्नाटकी हापूस 564 पेट्या आंबा बाजारात विक्रीसाठी आला होता.
सध्या कोकण हापूस १५०० रुपये डझन तर कर्नाटक हापूस १२०० डझन दराने विकला जात आसल्याचे चित्र मुंबई फळबाग आत सध्या दिसत आहे.
व्यापारीवर्ग सुद्धा आंब्याच्या स्वागताच्या तयारीला लागलेले आपल्याला दिसतात. आंबा हंगामासाठी आपल्या गाळा भाडेकरून कडून खाली करून घेऊन आलेल्या मुहूर्तावर पेटीचे पूजन करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
तर सर्वसामान्य ग्राहक आंब्याची आवक वाढून आंबा आपल्या टप्प्यात कधी येतोय याची वाट पाहत आहेत.