Pune Metro Update : पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर असून औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात देखील पुणे शहराने खूप मोठी प्रगती केलेली आहे.
साहजिकच वेगाने विकसित झालेल्या या शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे देखील तितकेच गरजेचे आहे व याच दृष्टिकोनातून पुणे शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आलेले आहेत तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत व त्यातीलच एक म्हणून आपल्याला पुणे रिंग रोडचा उल्लेख करता येईल.
तसेच सध्या पुण्यामध्ये दोन टप्प्यात मेट्रो सुरु करण्यात आलेली असून दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याही पुढे जात आता स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रवास लवकरच सुरू करण्यात येणार असून या ठिकाणचे काम देखील आता वेगात सुरू आहे. मेट्रो कडून पुढील दोन्ही टप्प्यांमध्ये काम युद्ध पातळीवर पूर्ण केले जाणार आहे.
स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान धावणार मेट्रो
बाबतचे सविस्तर वृत्त असे की लवकरच स्वारगेट ते शिवाजीनगर या दरम्यान मेट्रो धावणार असून पुणेकरांना मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. लवकरच रुबी हॉल स्थानक ते रामवाडी हा मेट्रोचा मोठा टप्पा प्रवाशांकरीता सुरू केला जाणार असून सिविल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावरील तीन भुयारी स्थानकांची कामे अद्याप बाकी आहेत व ही कामे तातडीने पूर्ण करण्याकरता मेट्रोच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून या तीनही स्थानकांचे कामे एकाच वेळी केली जाण्याची शक्यता आहे.
मेट्रोच्या स्वारगेट स्टेशनच्या कामाची स्थिती
स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम 85% पर्यंत पूर्ण झाले असून उरलेले काम पूर्ण करण्यासाठी मेट्रो कडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशन हे भूमिगत स्थानक असून या स्थानकावरील दोन मजले पूर्णपणे बांधून देण्यात येणार आहेत व वरील मजले हे पीपीपी तत्त्वावर म्हणजेच पार्टनर अर्थात भागीदारांच्या माध्यमातून बांधले जाणार आहेत.
जर आपण स्वारगेट स्टेशनचा विचार केला तर पीएमपीएच्या एकूण 20 बस या ठिकाणी मावतील एवढी क्षमता या स्टेशनची आहे. स्वारगेट या ठिकाणचा विचार केला तर पुणे शहराचे हृदय म्हणून या परिसराला ओळखले जाते व या ठिकाणाहून दररोज लाखो नागरिकांची वाहतूक आणि वर्दळ असते.
याच दृष्टिकोनातून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत स्थानके देखील करण्यात आले असून या अगोदर देखील या ठिकाणी पी एम पी चे मोठे स्थानक ग्राह्य धरले होते. या ठिकाणी आता हे मेट्रोस्थानक उभारले जात आहे.
मेट्रोचे स्वारगेट हे स्थानक दुहेरी असणार असून या स्थानकाच्या वरच्या इमारतीचे मजले हे कमर्शियल वापरासाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या जर आपण स्वारगेट या भूमिगत स्थानकाचा विचार केला तर 85% पर्यंत याचे काम पूर्ण झालेले आहे.
आता एलिव्हेटेड इमारतीचे बांधकाम सुरू असून चार ते पाच मजल्यापर्यंत एलिवेटेड पद्धतीने हे काम केले जाणार आहे. सध्या कामाचा वेग पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुणेकरांसाठी ते खुले होईल अशी अपेक्षा आहे.