Guava Farming : आपल्या देशात विविध फळ पिकांची शेती केली जाते. पेरू, डाळिंब, द्राक्ष, केळी, सिताफळ, सफरचंद, स्ट्रॉबेरी अशा विविध फळांची आपल्या भारतात लागवड होते. राज्याचा विचार केला असता राज्यात डाळिंब आणि द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी देखील मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. राज्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
दुसरीकडे डाळिंब आणि द्राक्ष ही फळपिके नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण पेरूचे भारतात सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते.
याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पेरू या फळ पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील लागवड केली जाते. राज्यातील विविध भागात पेरूची लागवड केली जाते. विशेष म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पेरूच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत आहे.
अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता पेरू लागवडीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. पण भारतात सर्वात जास्त पेरू कोणत्या राज्यात पिकवला जातो ? हे आता आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
उत्तर प्रदेश : पेरूचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेश या राज्यात घेतले जाते. पेरू उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो. देशाच्या एकूण पेरू उत्पादनापैकी या राज्यात 21.78% एवढे पेरूचे उत्पादन घेतले जाते.
मध्य प्रदेश : पेरू उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यात देशातील एकूण पेरू उत्पादनापैकी 17.20% एवढे उत्पादन घेतले जाते.
बिहार : या यादीत बिहारचा देखील नंबर लागतो. पेरू उत्पादनाच्या बाबतीत बिहार तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 9.65% पेरू उत्पादन घेतले जाते.
आंध्र प्रदेश : आंध्रप्रदेश मध्ये देशाच्या एकूण पेरू उत्पादनापैकी 7.42% एवढे पेरू उत्पादन घेतले जाते. यामुळे पेरू उत्पादनाच्या बाबतीत आंध्र प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.
हरियाणा : या यादीत हरियाणा राज्याचा पाचवा क्रमांक लागतो. हरियाणा राज्यात देशाच्या एकूण पेरू उत्पादनापैकी सहा टक्के एवढे उत्पादन घेतले जाते.