शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! भुईमुगाच्या दुष्काळ सहन करणार्‍या, जास्त उत्पादन देणार्‍या जाती कोणत्या ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Groundnut Farming : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगामाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील गहू,  हरभरा, भुईमूग यांसारख्या पिकांची पेरणी सुरू झाली आहे. काही भागात तर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण देखील झाली आहे.

मात्र यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पुरेसा पाऊस झाला नसल्याने काही भागात रब्बी पिकांची पेरणी होणार नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात फक्त 88 टक्के एवढा पाऊस झाला आहे. अर्थातच सरासरीच्या तुलनेत यंदा 12% कमी पाऊस पडला आहे.

याचा परिणाम म्हणून काही भागात खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय याचा प्रभाव रब्बी हंगामावर देखील पाहायला मिळणार आहे.

मात्र असे असले तरी ज्या भागात थोडाफार पाऊस झाला आहे तिथे रब्बीची पेरणी सुरू आहे. भुईमुगची देखील पेरणी केली जात आहे.

यंदा मात्र दुष्काळ सहन करणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या भुईमूगाच्या जातीची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या भुईमूग पिकाच्या दुष्काळ सहन करणार्‍या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कृषी विभाग, नवी दिल्ली आणि ICAR यांनी शिफारशीत केलेल्या भुईमुगाच्या जाती आज आपण पाहणार आहोत.

DH 257 : हा वाण 2021 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. हा भुईमुगाचा एक सुधारित वाण असून याची महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात शिफारस करण्यात आली आहे. भुईमुगाचा हा वाण 120-125 परिपक्व होत असतो.

Jagtial Palli 1 (JGC 2141) : भुईमुगाचा हा देखील एक सुधारित वाण आहे. हा वाण 2020 मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे. अलीकडे प्रसारित झालेला हा वाण तेलंगणा राज्यासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीचे पीक 110 दिवसात परिपक्व होते. 

GKVK 5 : भुईमूगाचा हा वाण 2016 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. ही जात 115 ते 120 दिवसात परिपक्व होतो. ही जात दक्षिण कर्नाटकासाठी शिफारशीत करण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा