Grape Production In India : तुम्हालाही द्राक्ष खाणे आवडते का ? हो, नक्कीच आवडत असेल. काळे द्राक्ष, हिरवे द्राक्ष असे विविध जातीचे द्राक्ष बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. द्राक्षांना बाजारात चांगली मागणी देखील आहे.
पण हे पीक उत्पादित करणे पाहिजे तेवढे सोपे नाही. एकतर या पिकाला कमी पावसाचा, जास्ती पावसाचा, गारपिटीचा, ढगाळ हवामानाचा मोठा फटका बसतो. तसेच द्राक्ष बागेची मशागत ही खूपच अवघड असते.
त्यामुळे द्राक्षाचे पीक उत्पादित करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. अनेकदा मात्र नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षाच्या पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.
जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा संपूर्ण द्राक्षाचा प्लॉट हार्वेस्टिंग साठी रेडी आहे आणि अचानक वातावरणात काहीसा बदल झाला अन पाऊसच पडला तर त्या शेतकऱ्याने ज्या रेटमध्ये त्या प्लॉटचे सौदे केले असतील त्या रेटमध्ये तो माल विकला जात नाही.
कारण की, पावसामुळे लगेचच द्राक्षचे मनी फुटतात. काही प्रसंगी कमी नुकसान होते तर काही वेळा संपूर्ण बाग पावसामुळे वाया जाते. हे एक फक्त उदाहरण होते. पण, द्राक्ष हे एक रिस्की पीक आहे.
दरम्यान, द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन हे आपल्याच महाराष्ट्रात घेतले जाते.
सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते एवढेच नाही तर देशाच्या एकूण उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त वाइनरी तुम्हाला पाहायला मिळतील.
राज्यात द्राक्षाचे उत्पादन विविध जिल्ह्यांमध्ये घेतले जाते मात्र नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनाचा किंग आहे. या जिल्ह्याला द्राक्षाचे आगार म्हणून ओळखतात आणि नाशिकला वाईन सिटी म्हणून पूर्ण जगात ओळख मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकूण द्राक्ष उत्पादनापैकी 50 टक्के द्राक्षाचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत कर्नाटक हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या राज्यात 24.49% एवढे उत्पादन घेतले जाते. म्हणजे या 2 राज्यात जवळपास 95% च्या आसपास उत्पादन घेतले जाते. त्याशिवाय आंध्र प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यातही काही भागांमध्ये द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.