सध्या बाजारपेठेतील हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीने धान्याची विक्री करता यावी म्हणून सरकार नाफेड च्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी करणार आहे.
तर तुर आणि हरभरा पिकासाठी सध्या नाफेड च्या माध्यमातून अशा शेतमाल खरेदी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
कृषी विभागाने जाहीर केलेल्या आगाऊ अंदाजामुळे हरभऱ्याचे उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. उत्पादन क्षेत्र वाढूनही शेतकऱ्यांना थेट खरेदी केंद्राचा आधार घेता येणार आहे.
त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी शक्य आहे. तर त्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर पिकाची नोंद करणे आवश्यक आहे.
बाजारपेठेची स्थिती पाहता हरभऱ्याचे दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे या सरकारी कृषी हमीभाव योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
सरकार हरभऱ्याचे विक्रमी खरेदी करणारा :-
या वर्षी हरभरा उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याकारणामुळे हरभरा खरेदी चे नियोजन करणे हा सरकार पुढे मोठा प्रश्न होता.
पण नाफेडच्या माध्यमातून सरकारने खरेदी केंद्र उभारली. आणि राज्यातील खरेदी केंद्रांच्या माध्यमातून 6 लाख 89 हजार टन हरभऱ्याची खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे.
तर राज्यात 33 जिल्ह्यात मध्येही खरेदी केंद्र उभारण्यात आली असून. 1 मार्च पासून नोंदणी नंतर प्रति शेतीकरी हरभरा खरेदी करण्याचे आदेश पणन महासंघाने दिले आहेत.
हमी भावामुळे शेतकरी आनंदी :-
दरवर्षीप्रमाणे आवक वाढली तर दरात घसरण झाली असती पण हरभऱ्याच्या हमी भावामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे .
कृषी विभागाने खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर निश्चित केला असून दुसऱ्या खुल्या बाजारात त्या तुलनेने 4 हजार 200 ते 4 हजार 700 असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.
राज्यातील हरभऱ्याची उत्पादकता अंदाजे :-
कृषी विभागाकडून दरवर्षी पीक कापणीपूर्वी उत्पादकता ठरवण्यात येते. ही उत्पादकता क्विंटलमध्ये मोजली जाते.
त्यानुसार राज्यातील काही ठिकाणचे उत्पादक दर नगर: 7.5, पुणे : 8.60, सोलापूर:6.50, सातारा : 9.25, सांगली: 11.6, कोल्हापूर : 12.00,
ठाणे : 7.10, पालघर:7.50, रायगड: 4.50 , रत्नागिरी : 4.90, वाशिम : 7.00, यवतमाळ : 12.00, अमरावती : 15.60, नागपूर : 15.00, भंडारा : 8.00, गोंदिया : 8.10, चंद्रपूर : 7.50,
गडचिरोली : 4.7, नाशिक: 9.50, धुळे : 10.97, नंदूरबार : 13.96, जळगाव : 13.00, परभणी : 8.20, हिंगोली :11.00, नांदेड : 11.50, लातूर : 13.50, उस्मानाबाद : 6.5, बीड : 9.5, जालना :13.00, औरंगाबाद : 5.80, बुलडाणा: 11.80, अकोला : 15.00 या प्रमाणे.