हरभरा लावताय ? ‘या’ वाणाची पेरणी ठरणार फायदेशीर, मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. राज्यासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. काही भागात पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी येत्या काही दिवसात पेरणी पूर्ण केली जाणार आहे. यंदा कमी पावसामुळे मात्र रब्बी हंगामात लागवडीखालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

पण ज्या ठिकाणी मान्सून काळात बऱ्यापैकी पाऊस बरसला आहे त्या भागात नेहमीप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण केली जाणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे.

यापैकी हरभरा या पिकाचा विचार केला तर याचे लागवडीखालील क्षेत्र देशातील मध्यप्रदेश आंध्र प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. याशिवाय आपल्या राज्यातही हरभरा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते.

तथापि हरभऱ्याच्या शेतीतून चांगले विक्रम उत्पादन जर मिळवायचे असेल तर याच्या सुधारित वाणांची पेरणी करणे अति आवश्यक आहे., अशा परिस्थितीत आज आपण हरभऱ्याच्या काही सुधारित वाणांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हरभऱ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

पुसा पार्वती (BG 3062) : पुसा पार्वती (BG 3062) हा वाण हरभऱ्याचा सुधारित वाण आहे. हा वाण अलीकडेच शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीसाठी महाराष्ट्रातील हवामान अनुकूल आहे. या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या जातींचे पीक लागवडीनंतर 113 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होत असते. या जातीपासून जवळपास २२.९४ क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते. ही जात मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थानमध्ये पेरणीसाठी उपयुक्त असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. 

फुले विक्रम (फुले जी ०८१०८) : हरभऱ्याची ही जात अलीकडेच विकसित करण्यात आली आहे. या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष पूरक असल्याचा दावा केला जातो.

या जातीचे पीक जवळपास 115 दिवसांमध्ये परिपक्व होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. या जातीपासून सुमारे २२.९४ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

JG 24 (JG 2016-24) : हरभऱ्याची ही जात 2020 मध्ये विकसित झाली आणि राज्यासहित देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आली आहे. या वाणाची पेरणी देशातील विविध राज्यांमध्ये केली जाऊ शकते. या जातीचे पीक पेरणीनंतर साधारणतः 115 दिवसात परिपक्व होत असते.

या वाणातून 22.37 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हरभऱ्याच्या या जातीची लागवड मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशासह महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये करता येऊ शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा