Gram Farming : मित्रांनो सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. राज्यातील अनेक भागात खरीप हंगामातील पिकांची काढणी देखील सुरू झाले आहे.
मित्रांनो सध्या मराठवाडा आणि विदर्भ विभागात खरीप हंगामातील सोयाबीन या पिकाची काढणी होताना नजरेस पडत आहे. राज्यातील इतरही विभागात खरीप हंगामातील पिकांची काढणी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात शेतकरी बांधव (Farmer) रब्बी हंगामाकडे वाढणार आहेत.
मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात गहू या अन्नधान्य पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याबरोबरच हरभरा (Gram Crop) या कडधान्य पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा हे कडधान्य पीक रब्बी हंगामातील एक मुख्य पीक (Rabi Crops) म्हणून ओळखले जाते. मित्रांनो आपल्या राज्यात हरभरा लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव हरभरा या कडधान्य पिकांचे देशी वाण तसेच काबुली वाणाची (gram variety) मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधवांनी पाण्याची उपलब्धता पाहून काबुली जातीच्या हरभऱ्याची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरणी करावा. हरभऱ्याची वेळेवर पेरणी न केल्यास शेतकरी बांधवांना उत्पादनात घट सहन करावी लागू शकते. तसेच कोरडवाहू भागात शेतकरी बांधवांनी 20 सप्टेंबर नंतर आणि जमिनीची ओल कमी होण्यापूर्वी हरभऱ्याची पेरणी करावी. कोरडवाहू भागात विजय दिग्विजय आणि फुले विक्रम या जातीच्या हरभऱ्याची पेरणी करण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.
हरभऱ्याच्या कोणत्या सुधारित वाणाची पेरणी करावी
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहिती नुसार, विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे हरभऱ्याचे सुधारित वाण आहेत. या जाती जिरायती भागात तसेच बागायती भागात आणि उशिरा पेरणी साठी देखील उपयुक्त आहेत. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या हरभऱ्याच्या जाती मर रोगास प्रतिकारक आहेत. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे तीन वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि या पासून चांगले उत्पादन कोरडवाहू भागात देखील घेतले जाऊ शकते.
मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांकडे सिंचनाची पर्याप्त सुविधा उपलब्ध असेल त्यांनी काबुली वाणाची लागवड करायची असल्यास विराट, पिकेव्ही -2, पिकेव्ही -4 आणि कृपा हे वाण निवडावं. या वाणापासून निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की विराट हा काबुली वाण अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे शिवाय ही जात मर रोगास देखील प्रतिकारक आहे.
शेतकरी बांधव बागायती भागात लागवडीसाठी फुले विक्रांत या वाणाची निवड करू शकतात. तसेच विशाल या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाची देखील शेतकरी बांधव निवड करू शकतात. नव्याने विकसित करण्यात आलेली फुले विक्रम ही जात देखील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.