शेतकऱ्यांना कधी कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल हे निश्चित सांगता येत नाही. कधी नैसर्गिक सृष्टिचक्र, तर कधी सरकारी योजना त्यात सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे त्याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे.
तर आताच सरकारने मुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तर त्यामुळे देशांतर्गत तुरीच्या दरावर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे तूर उत्पादन शेतकरी आर्थिक फटका नक्कीच बसणार असल्याचे चित्र ह्या निर्णयामुळे तयार झाले आहे.
आतापर्यंत सरकारने सोयाबीन, हरभरा व तुर यांच्या बाबतीत सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. त्यामुळे सोयाबीन, हरभऱ्याला विक्रमी दर मिळाले होते.यामुळे शेतकरी काहीसे आनंदीत होते.
पण आता सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकरी निराश झाले आहे. आयातीची मुदत ही मार्चनंतर संपणार होती. तर मुदत संपल्यानंतर देशातील तूरीचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण आता सरकारने तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली त्यामुळे
म्यानमार, बर्मा, मालावी, केनिया यासह इतर देशातून तुरीची आवक ही वर्षभर कायम राहणार असल्यामुळे
देशातील शेतकऱ्यांचा तूरीला विक्रमी दर मिळण्याचे स्वप्न भंग पावले असून शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशाच पडली आहे.