Government Scheme : सध्या देशात दीपोत्सवाचा सण साजरा होत आहे. दीपोत्सवाच्या सणाला अर्थातच दिवाळीच्या काळात अनेक जण नवीन व्यवसायाची सुरुवात करतात. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी देखील करतात. दरम्यान जर तुम्हीही दिवाळीच्या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. खरे तर व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासत असते.
पण अनेकांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसते. यामुळे इच्छा असूनही व्यवसाय सुरू करता येत नाही. दरम्यान अशाच लोकांसाठी सरकारच्या माध्यमातून काही योजना सुरू करण्यात आले आहेत. आज आपण शासनाच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या योजनेची माहिती पाहणार आहोत त्यातून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना सरकारकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सरकारकडून तब्बल वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही २० लाखांपर्यंत लोन घेऊ शकतात.
खरे तर या योजनेच्या माध्यमातून आधी फक्त १० लाखांपर्यंत लोन मिळायचे. परंतु आता या लोनची रक्कम वाढवण्यात आली आहे. यामुळे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. आता आपण पीएम मुद्रा लोन योजनेचे स्वरूप थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप
या योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन दिले जात आहे. नॉन अग्रिकल्चरल व्यवसाय सुरू करण्यासाठी अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून तीन कॅटेगिरी मध्ये कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन या तीन कॅटेगरीत लोन दिले जाते.
शिशु लोन या कॅटेगरी अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये लोन दिले जाते. तसेचं, किशोर लोन कॅटेगरी अंतर्गत व्यवसायासाठी ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन दिले जाते. शिवाय तरुण लोन या कॅटेगरीत ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
कर्जाचे व्याजदर कसे आहेत
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी 9% पासून ते 12 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर वसूल केले जाते. यामुळे ज्या लोकांना व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु ज्यांच्याकडे स्वतःचे भांडवल नाही अशा लोकांसाठी या योजनेचा फायदा होणार आहे.
तथापि या योजनेअंतर्गत दिले जाणारे वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे ज्या लोकांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला आहे आणि आधीच्या कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड केली आहे त्यांनाच दिले जाणार आहे.