Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. गोरगरीब जनतेला शासनाकडून रास्त भावात रेशन उपलब्ध करून दिले जात आहे. शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना स्वस्तात गहू आणि तांदूळ पुरवले जात आहे. विशेष म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ सोबतचं साखर देखील दिली जाते.
ज्या लोकांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना गहू, तांदूळ आणि साखर दिली जात आहे. दरम्यान राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी सणासुदीच्या काळात एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे अंत्योदय रेशन कार्डधारक नागरिकांना आता एकाच वेळी तीन किलो साखर दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्यांच्या काळातील तीन किलो साखर अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मे महिन्याच्या रेशन सोबत दिली जाणार आहे.
यामुळे राज्यातील पात्र अंत्योदय रेशन कार्डधारक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरवठा विभागाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाच्या माध्यमातून अंत्योदय रेशन कार्डधारकांना स्वस्त दरात साखर देखील उपलब्ध करून दिली जात आहे. उर्वरित रेशन कार्डधारकांना मात्र साखर मिळत नाही. उर्वरित रेशन कार्डधारकांना फक्त गहू आणि तांदूळ दिला जातो.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून अंत्योदय रेशन कार्डधारकांना नियमित साखरेचे वाटप होत नसल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षात अर्थात 2023 मध्ये राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारकांना चार महिने साखर मिळाली नव्हती. त्यामुळे सदर लाभार्थ्यांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात होती. गहू, तांदूळ वेळेवर मिळू शकतो मग साखर का वेळेवर मिळत नाही हा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
नागरिकांची ही नाराजी पाहता शासनाने जानेवारी 2024 मध्ये एकाच वेळी चार महिन्यांची साखर दिली. मात्र जानेवारीनंतर पुन्हा एकदा अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळणारी साखर बंद झाली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात अंत्योदय रेशन कार्डधारकांना साखर उपलब्ध झाली नाही.
मात्र आता मे महिन्याच्या रेशन सोबत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळातील तीन किलो साखर या सदर लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. तथापि, नागरिकांच्या माध्यमातून अंत्योदय रेशन कार्डधारकांना नियमित साखरेचे वाटप झाले पाहिजे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.