Pune Railway News : गेल्या महिन्यात विजयादशमीचा आणि या चालू महिन्यात दिवाळीचा सण संपन्न झाल्यानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते नवीन वर्षाकडे. सर्वांनाच आता नवीन वर्षाची चाहूल लागली आहे.
दरम्यान, सालाबादप्रमाणे याहीवर्षी या चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाला वेलकम करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांशी नागरिक गोव्याला जाणार आहेत. यामध्ये पुणे आणि मुंबई मधून मोठ्या प्रमाणात नागरिक गोव्याला जातील असा अंदाज आहे.
दरम्यान या नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमस सणाला गोव्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे विभागाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की, या नवीन निर्णयानुसार पुणे जंक्शन वरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. पुणे ते गोव्यादरम्यान ही विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे.
यामुळे पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे. ही ट्रेन या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अधिक गतिमान बनवणार आहे आणि प्रवाशांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सणासाठी गोव्यात जाणे आणि गोव्याहून परतणे सोयीचे होणार आहे.
कसा राहणार रूट अन वेळापत्रक ?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जंक्शन ते गोव्यातील करमाळी रेल्वे स्टेशन दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 22 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्टेशन वरून रवाना होणार आहे.
ही गाडी या कालावधीत पुणे जंक्शन वरून सकाळी साडेपाच वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमाळा येथे पोहोचणार आहे. तसेच 24 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी करमाळी रेल्वे स्टेशन वरून ही गाडी रवाना होणार आहे.
या कालावधीत ही गाडी करमाळी येथून सकाळी 9 वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे आणि पुण्याला ही गाडी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे. ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.