Panjabrao Dakh: पंजाबरावांचा आनंददायी असा हवामान अंदाज! या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस, महत्त्वाचा अंदाज
संपूर्ण राज्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला व त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. परंतु त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये पावसाने चांगल्या पद्धतीने हजेरी लावली व परत पावसाने खंड दिल्याची परिस्थिती निर्माण झालेली होती.
जर पावसाळ्याची सुरुवात आणि आतापर्यंतचा कालावधी पाहिला तर जवळपास तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून खरिपाच्या पिकांसाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
तसे पाहायला गेले तर गेल्या दोन ते चार दिवसापासून राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होत असून अमरावती जिल्ह्यातील पावसाचे धरणे शंभर टक्के भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे संपूर्ण दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत.या सगळ्या परिस्थितीत मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी पावसाचा एक दिलासादायक अंदाज वर्तवलेला आहे.
पंजाबरावांनी पावसाचा वर्तवला दिलासादायक अंदाज
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाबद्दल एक दिलासादायक अंदाज वर्तवला असून त्यांच्या अंदाजानुसार राज्यांमध्ये 16 ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये खूप जोरदार पाऊस पडणार असून या कालावधीमध्ये राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
त्यामुळे या अंदाजामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधी मध्ये शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहून काम करावे असे देखील त्यांनी म्हटले आहे. राज्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर, मुंबई तसेच धुळे, जळगाव तसेच नंदुरबार आणि विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच या कालावधीत नाशिक,पुणे, मुंबई अहमदनगर या भागात तसेच विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी शक्यता देखील त्यांनी नमूद केली आहे. या पावसाचा सकारात्मक परिणाम हा राज्यातील काही धरणातील पाणीसाठा वाढण्यात होईल.