Pune Railway News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून ख्यातनाम असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या होत असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. यंदा तर लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि यामुळे ही गर्दी वाढली आहे. दरम्यान प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर विशेष उन्हाळी गाड्या चालवल्या जात आहेत.
पुणे अन नगरकरांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन पुणे ते ओडिशा मधील बालेश्वर यादरम्यान चालवली जाणार आहे.
या समर स्पेशल एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकासहित अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे.
दरम्यान आता आपण या स्पेशल एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बालेश्वर सुपर फास्ट स्पेशल (गाडी क्रमांक ०१४५१) ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून येत्या सहा दिवसांनी अर्थातच 18 मे 2024 ला साडेअकरा वाजता सोडली जाणार आहे.
ही गाडी दुसऱ्या दिवशी 21:30 वाजता ओडिशा येथील बालेश्वर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीच्या प्रतीचा प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक ०१४५२ ही समर स्पेशल ट्रेन बालेश्वर रेल्वे स्थानकावरून 20 मे ला नऊ वाजता सोडली जाणार आहे. ही गाडी पुण्याला दुसऱ्या दिवशी 19:30 वाजता पोहोचणार आहे. या समर स्पेशल ट्रेनमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, या समर स्पेशल ट्रेनला दौंड कॉड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा,
बिलासपूर, चंपा, शक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चकराधरपूर, टाटानगर आणि खरगपुर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.