भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा विषय निघाला की सर्वप्रथम रेल्वेचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. याचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले असल्याने देशातील कोणत्याही भागात जायचे असले तरी देखील रेल्वे उपलब्ध असते.
विशेष बाब अशी की, रेल्वे विभागाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जात असतात. प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील सुरू करण्यात आल्या आहेत. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. महाराष्ट्राला देखील आतापर्यंत आठ वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे.
राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते मडगाव, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून भरभरून असा प्रतिसाद दाखवला जात आहे. यामुळे रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असून परिणामी रेल्वे विभाग खूपच गदगद झाले आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर आणि वंदे भारत मेट्रो गाड्या देखील रुळावर धावणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, पुढल्या महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन लाँच होणार आहे. ऑगस्ट महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे देशातील पहिली स्लीपर वंदे भारत आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते मुंबई या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.
जर हा देखील प्रस्ताव मान्य झाला तर या मार्गावरही ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वंदे भारत मेट्रो ट्रेन देखील लवकरच रुळावर धावणार असून आता याच मेट्रो ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी उत्तर प्रदेश मधील लखनऊ ते कानपूर या दरम्यान चालवली जाणार आहे. या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन जाऊ शकते असा दावा केला जात आहे. मात्र असे असले तरी या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. तथापि जर या मार्गावर ही मेट्रो ट्रेन सुरू झाली तर लखनऊ ते कानपूरचा प्रवास खूपच जलद होणार आहे.