Maharashtra Railway News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानकांवर प्रवाशांची झुंबड पाहायला मिळत आहे.
खरंतर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनता आपल्या मूळ गावाकडे परतत असते. यंदा मात्र लोकसभा निवडणुका देखील सुरु आहेत. यामुळे लग्न सराई, उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणूक या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या अधिक पाहायला मिळत आहे.
दरम्यान प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत विविध रेल्वे मार्गांवर अनेक विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. दरम्यान, मध्ये रेल्वे प्रशासनाने सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत अहमदाबाद ते खुर्दा रोड यादरम्यानही उन्हाळी विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक नेमके कसे राहणार, या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार ? या संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-खुर्दा रोड विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९४२३) अहमदाबाद येथून दिनांक १५ मे, १७ मे, २२ मे आणि २९ मे ला १९.१० वाजता निघणार आहे आणि तिसऱ्या दिवशी १२.०० वाजता खुर्दा रोड येथे पोहोचणार आहे.
तसेच खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस अर्थातच गाडी क्रमांक ०९४२४ ही ट्रेन खुर्दा रोड येथून १७ मे, १९ मे, २४ मे आणि ३१ मे ला १६.३० वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ०१.०० वाजता उधना येथे पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09424 आणि ट्रेन क्रमांक 09423 नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, तितलागढ़, बांलगीर, हिराकुड, संबळपूर,
रायराखोल, अंगुल, तलचेर, धेंकनाल आणि भुवनेश्वर या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 09423 ला वडोदरा, सुरत आणि उधना या तीन रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.