Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की, ही संख्या आणखी वाढत असते. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
या अतिरिक्त प्रवाशांमुळे मात्र सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान ही अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून देखील धावणार आहे. ही गाडी राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे सुरत ते खुरदा रोड दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने राज्यातील प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. दरम्यान, आता आपण या स्पेशल एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक आणि ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक ?
पश्चिम रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरत – खुरदा रोड स्पेशल ( गाडी क्रमांक ०९०१९ ) ट्रेन सुरत येथून गुरुवारी सोडली जाणार आहे. ही ट्रेन १६ मे २०२४ ला २३.५० वाजता सुरत येथून रवाना होईल आणि शनिवारी १२.०० वाजता खुरदा रोडला पोहोचणार आहे.
तसेच, खुरदारोड – उधना स्पेशल (गाडी क्रमांक ०९०२० ) ही गाडी शनिवारी, १८ मे ला चालवली जाणार आहे. ही ट्रेन खुरदा रोडवरून १६.३० वाजता सुटणार आहे आणि सोमवारी उधना, सुरत येथे पहाटे १ वाजता पोहोचणार आहे. या समर स्पेशल ट्रेनमुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे. या ट्रेनमुळे अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहील असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा देणार
ही गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या गाडीला राज्यातील नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, टिटलागड, बलांगीर, हिराकुड, संबळपूर, रायराखोल, अंगुल, तालचेर, ढेंकनाल आणि भुवनेश्वर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाईल असे म्हटले जात आहे.