Mumbai Railway News : मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन अर्थातच जीवितवाहिनी म्हणून संबोधले जाते. याचे कारण देखील तसे खासच आहे. मुंबईमधील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही प्रवासासाठी लोकलवर अवलंबून आहे. कदाचित हे प्रमाण यापेक्षा अधिकही असू शकतो. हेच कारण आहे की मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मात्र लोकलने प्रवास करणे खूपच आव्हानात्मक आहे.
लोकल गाड्यांमध्ये होणारी गर्दी, शिवाय लोकल वेळेवर न येणे, लोकलचा वेग कमी असणे यांसारख्या अनेक कारणांमुळे लोकलचा प्रवास हा वेळ खाऊ बनला आहे. अनेक मार्गांवरील लोकलचा प्रवास हा प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. एकतर तुडुंब भरलेल्या लोकलमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मग जीव मुठीत घेऊन केलेला प्रवास जर वेळेत पूर्ण झाला नाही तर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
मात्र आता नवीन वर्षात काही रेल्वे मार्गांवरील लोकल प्रवास अधिक सुरफास्ट होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यानचा 80 मिनिटांचा लोकल प्रवास आता फक्त एका तासात पूर्ण होईल अशी आशा आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार या मार्गावरील लोकलचा वेग वाढणार आहे. मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर आणि नेरूळ ते खारकोपर दरम्यान लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी काही महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत.
या मार्गावरील रेल्वे गाड्या आता 105 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकणार आहेत. यामुळे या मार्गावरील लोकलच्या प्रवासात तब्बल 15 ते 20 मिनिटांची बचत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. रेल्वेरुळांचे मजबूतीकरण, रुळांलगत असलेल्या झोपड्या हटवणे आणि ओव्हरहेड वायरमध्ये आवश्यकतेनुसार बदल या गोष्टी वेग वाढवण्यासाठी करण्यात येणार आहेत.
ही सर्व कामे नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या काळात पूर्ण होतील अशी आशा आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुमाराला या रेल्वे मार्गांवर जलद गतीने लोकल धावणार आहे. सध्या स्थितीला सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने लोकल धावत आहे. मात्र ही प्रस्तावित करण्यात आलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण झाली तर या मार्गावर लोकलचा वेग वाढणार आहे.
या मार्गावरील लोकलचा वेग हा 105 किलोमीटर प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे सीएसएमटी ते पनवेल हा 80 मिनिटाचा प्रवास 65 ते 70 मिनिटात पूर्ण होईल अशी आशा आहे. सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-बेलापूर या मार्गावरील वेग वाढवला जाणार आहे. सोबतच ठाणे-वाशी, नेरुळ-खारकोपर आणि कर्जत ते खोपोलीदरम्यानच्या लोकलचा देखील वेग वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.