Mumbai Metro News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई लोकलमध्ये देखील मोठी गर्दी होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकलवर आणि रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येत आहे. परिणामी आता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीए मैदानात उतरले आहे.
एम एम आर डी ए च्या माध्यमातून विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. MMRDA च्या माध्यमातून राजधानी मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे मोठे जाळे विकसित होऊ लागले आहे. शहरात सद्यस्थितीला काही मार्गांवर मेट्रो सुरू आहे. तर काही मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. खरंतर, जेव्हा पण राजधानी मुंबईचा विषय निघतो तेव्हा लोकलचा विषय निघतोच. लोकलचे चित्र सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते.
लोकलला मुंबईची जीवित वाहिनी म्हणून ओळखले जाते. मात्र लोकल गाड्यांमध्ये असणारी तोबा गर्दी मुंबईकरांसाठी अडचणीची ठरत आहे. लोकलमध्ये खूपच अधिक गर्दी असल्याने अनेकदा लोकल प्रवासादरम्यान अपघात देखील होतात. अनेकांना लोकलच्या प्रवासादरम्यान आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यामुळे यावर उपाययोजना म्हणून शहरात आता मेट्रोची उपलब्धता करून दिली जात आहे.
दरम्यान मुंबई मेट्रो बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे आता कल्याण-तळोजा मेट्रो १२ मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार आहे. या नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नवीन मेट्रो मार्गमुळे मुंबईकरांना ठाणे तसेच नवी मुंबईला सहजतेने जाता येणार आहे.
हा प्रवास अधिक जलद होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी या मेट्रोमार्गासाठी आवश्यक असलेल्या कारशेडसाठी एक हजार 877 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे या मार्गाचे लवकरच काम सुरू होणार असे चित्र आहे.
दरम्यान या मार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर 2025 पर्यंत हा मेट्रोमार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती जाणकार लोकांच्या माध्यमातून समोर येत आहे. हा मेट्रो मार्ग 12 वीस किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या संपूर्ण वीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी 5600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यानी यावेळी दिली आहे.
मेट्रो मार्गाचा फायदा काय
शहरात तयार होणारा हा नवीन मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परस्परांना मेट्रोने जोडली जातील असे सांगितले जात आहे. त्यामुळे या शहरादरम्यानचा प्रवास आधीच्या तुलनेत निश्चितच जलद होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसर्वे आगार, पिसर्वे, अमनदूत हे स्थानके या मेट्रो मार्गावर नव्याने विकसित होणार आहेत. यामुळे या भागातील प्रवाशांना आता मेट्रोची भेट मिळणार आहे.