प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईची अखेर करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणारे अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला. आपण सर्व एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काढले. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध अत्याधुनिक सुविधा असून स्थानिक कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे.
समुद्रातील दोन खांबांमधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटरचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. केंद्राकडून विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे.
मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितले. या प्रकल्पातील बोगदा खोदाई पूर्ण होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. मुख्यमंत्री शिंदे हेदेखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत.
प्रकल्पाची सद्यस्थिती
- (३० मे २०२३ पर्यंत)
- भौतिक प्रगती ७५.०० टक्के आर्थिक प्रगती – ६८.७६ टक्के
- (३० मे २०२३ पर्यंत)
प्रकल्पाच्या प्रगतीची आजतागायत कामगिरी
- बोगदा खोदाई १०० टक्के पूर्ण पुनः प्रापण ९५ टक्के पूर्ण
- समुद्रभिंत ८४ टक्के पूर्ण
- आंतरबदल ५६ टक्के पूर्ण
- पूल ५९ टक्के पूर्ण
रस्ता प्रकल्पातील वैशिष्ट्ये
बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास १२.१९ मी.) ॥ भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना
भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी
असा आहे प्रकल्प
रस्त्याची लांबी १०.५८ किमी
मार्गिका संख्या ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)
भराव टाकून बनवलेल्या रस्त्याची लांबी – ४.३५ किमी
पुलांची एकूण लांबी २.१९ किमी ॥ दुहेरी बोगद्यांची लांबी- प्रत्येकी २.०७ किमी, ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)
बोगद्याची वैशिष्ट्ये
प्रियदर्शनी पार्क ते स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) या पहिल्या बोगद्याचे खनन ११ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाले, तर १० जानेवारी २०२२ रोजी त्याचा ब्रेकथ्रू झाला.
२६ एप्रिल २०२२ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू झाले होते. त्याचा ब्रेकथ्रु मंगळवार, ३० मे रोजी प्रियदर्शनी पार्क येथे होत आहे.
प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार ७२१ कोटी रुपये, बांधकाम खर्च ८, ४२९ कोटी रुपये
प्रकल्पामुळे नागरिकांना होणार फायदा
सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रतिवर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत ॥ ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत
अतिरिक्त जवळ जवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत
हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह इत्यादी समाविष्ट
इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास शक्य
मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त विहारक्षेत्र (प्रॉमिनेड) उपलब्ध
सागरी तटरक्षक भिंतीमुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण तसेच वादळी लाटा व पुरापासून संरक्षण
हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या धार्मिक स्थळांजवळ तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध