Monsoon Update : देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी आता देशात सर्वत्र जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अल निनोचा प्रभाव कमी होऊन आता ला निना लवकरच त्यांची जागा घेणार आहे.
अल निनो आणि ला निना या दोन्हीचा प्रभाव खूपच विरुद्ध आहे. जगातील अनेक हवामान संस्थांचा दावा आहे की अल निनो गेला आहे आणि आता त्याच्या जागी ला निना येणार आहे. ला निना हा पावसाळ्याच्या दिवसांत सक्रिय होणार आहे. त्यामुळे यंदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि भारतातील सर्वोच्च हवामान शास्त्रज्ञ एम राजीवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अल निनो गेला असून आता हवामानाचा थंड टप्पा जवळ येणार आहे.
त्यामुळे देशात चांगला मान्सून बरसणार आहे. देशातील अनेक राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे ते संपेल असा दावा देखील करण्यात आला आहे. मे महिन्यात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीची परिस्थिती
गेल्या वर्षी देशभरात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. एल निनोचा प्रभाव असल्याने देशातील पावसाचे प्रमाण 36 टक्क्यांहून कमी राहिले होते. मात्र यावर्षी आता पावसाचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे पहिला मिळेल.
यंदाची शक्यता
भारतात एक मोठी हवामान घटना घडली ज्याला इंडियन ओशन डीपोल किंवा आयओडी म्हणतात. IOD जेव्हा प्रभाव दाखवते तेव्हा अल निनोचा प्रभाव कमी असतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही असाच प्रकार घडला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. मात्र सप्टेंबरमध्ये IOD ने एल निनोचा पराभव केला आणि 94 टक्के पाऊस पडला.
अहवाल काय म्हणतो?
जर यावेळी ला नीना वेळेवर आली तर भारतात सर्वाधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवणायत येत आहे. 1987-88 मध्ये एल निनो निघून गेल्यावर ला निना सक्रिय झाली होती त्यामुळे सर्वाधिक पावसाची नोंद यावर्षी करण्यात आली होती. यंदाही असेच होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगली आनंदाची बातमी आहे.