गेल्या दोन वर्षापासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न रखडलेला होता.तो आता मार्च महिन्याच्या आखेरी मिटणार आहे.
ठाकरे सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली. त्यात राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त 20 हजार 250 कोटींचा भार देखील पडला होता.
मात्र, त्यानंतर कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे उर्वरीत रक्कम 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती. तर सध्या उर्वरीत शेतकऱ्यांसाठी तब्बल 54 हजार 200 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आसून.
त्यामुळे या महिन्या अखेरीस 54 हजार शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी होणार आसल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना सांगितले. यावेळी विधान परिषदेत उर्वरीत शेतकऱ्यांची जरी कर्ज माफी करण्यात आली आसली तरी त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होणार हे स्पष्ट केले नव्हते.
त्यामुळे हे आश्वासन हवेतच राहणार का असा स्पष्ट प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. मात्र, यावर उत्तर देताना मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आसून यासंदर्भात बँकांनी 35 लाख थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली होती.
त्यानुसार कर्जमाफी केली जाणार आहे. असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कडून सांगण्यात आले.