Maharashtra Bus Travel : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील नागरिकांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट मिळाले आहे. आता राज्यातील काही नागरिकांना बसने मोफत प्रवास करता येणार आहे.
खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील महिलांसाठी एसटीच्या तिकीट दरात 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकीट दरात 100% सवलत दिली आहे.
म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येत आहे. अशातच आता नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट देण्यात आले आहे.
आता शहरातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. मोफत बस प्रवासाची सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी होणार असल्याचे वृत्त समोर आले असे.
नवी मुंबई शहरातील 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना उद्यापासून अर्थातच 13 नोव्हेंबर 2023 पासून एनएमएमटी बसेस मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एनएमएमटी बसचा प्रवास उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली होती.
या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तांची चर्चा देखील केली होती. दरम्यान या चर्चेनंतर नवी मुंबई पालिका आयुक्तांनी आता एनएमएमटी म्हणजे नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट बसेस मध्ये 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यामुळे नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) अंतर्गत एकूण ५४१ बसेसचा समावेश आहे. यात ५६ वातानुकूलित व्होल्वो बस आणि १९५ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. दरम्यान आता या बसेस मध्ये नवी मुंबई शहरातील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.