शेतकऱ्याच्या मालाची बाजारपेठेत नेहमीच चढ-उतरण होत असते. त्यामुळे कधी नफा तर कधी तोटा शेतकऱ्याला होत असतो. असेच काही रेशीम कोशाचे देखील काही दिवस चालले होते. तब्ब्ल सात वर्षांनी रेशीम कोशाचे भाव वाढले असून उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत.
यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्षात शेतकरी ‘रेशीम’ शेतीकडे वळले आणि कोरोना काळातील लॉकडाउनमुळे भाव अत्यंत उतरले. यामुळे अनेकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली. पण जे शेतकरी या प्रतिकूल परिस्थितीत देखील रेशीम शेतीत तग धरून राहिले त्यांना आज चांगले दिवस आले आहेत
तब्बल 7 वर्षांनी रेशीम कोसचे भाव वाढल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत. रेशीम विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारपेठा पैकी जालना, कर्नाटक सध्याच्या बाजार भावानुसार रेशीम कोशाला 800 ते 900 रुपये प्रति किलो तर कोशाची प्रतवारी चांगली असेल तर 920 ते 950 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनेकदा रेशीम शेती हा व्यवसाय चांगले पैसे मिळवून देतो. परभणी जिल्ह्यात तब्बल 200 ते 250 हेक्टरवर शेती केली जाते. तर रेशीम कोशाचे वाढलेले भाव बघता रेशीम शेती भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे.