Milk prices : दूध व्यवसायाला आता चांगले दिवस आले असून दूध व्यवसाय करणे आता परवडीचे ठरणार आहे. तर दुधाच्या किंमतीत लिटरमागे 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
गाईच्या खाद्य दारात गेल्या काही वर्षापासून वाढ झाली असून दुधाचे दर कमी असल्या कारणामुळे दूध व्यवसाय करणे जिकरीचे काम झाले होते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.
आता दूध संघाने निर्णय घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दायक असा भाव देण्याचे ठरवले आहे.याचे कारण म्हणजे या महिन्यात तब्बल दोनवेळा दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
नवीन दर लगेच लागू होणार आहेत. यासाठी महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक यांची बैठक पार पडली. यामध्ये दूध उत्पादकांचे 30 रुपये लिटरचे दूध संघाकडून 33 रुपये लिटर प्रमाणे घेतले जाणार आहे.
या बैठकी दरम्यान ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्या प्रक्रिया व्यावसायिकांवर कारवाई देखील केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर याची त्वरीत अंमलबजावणी केली जाणार आसून सहकारी आणि खासगी अशा 45 दुग्ध प्रकल्पांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
खरेदीचा दर हा तीन रुपयांनी वाढणार आहे. तर त्याची विक्री ही दोन रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मात्र आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.