शेतकऱ्यांनो, ‘या’ जातीच्या शेळीचे पालन सुरु करा अन काही दिवसातच लखपती बना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Rearing : राज्यात शेळीपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. शेतीसोबतच पशुपालन विशेषता शेळीपालन हा व्यवसाय अलीकडे मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. खरेतर शेळीला गरीबाची गाय म्हणून ओळखले जाते.

याचे संगोपन शेतकऱ्यांसाठी विविध कारणांनी फायदेशीर ठरत आहे. शेळीला खूपच कमी आहार लागतो, परिणामी शेळीपालन व्यवसायात खूपच कमी खर्च लागतोय. यामुळे शेळीपालन करण्याला विशेष पसंती दाखवले जात आहे.

ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गाई आणि म्हशी पालन सोबतच शेळीपालन हा व्यवसाय अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे.

मात्र शेळी पालन व्यवसायातून चांगले दूध किंवा मांस उत्पादन मिळवण्यासाठी शेळीच्या चांगल्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण शेळीच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

खरे तर शेळीच्या अनेक जाती आहेत. मात्र शेळीची सोनपरी ही जात विशेष लोकप्रिय आहे. या जातीच्या शेळी पासून शेतकऱ्यांना निश्चितच चांगली कमाई होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोनपरी जातीची शेळी ही प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळली जाते.

बरारी आणि ब्लॅक बंगाल या दोन जातीचे संकर करून ही नवीन सोनपरी शेळीची जात विकसित करण्यात आली आहे. या जातीच्या शेळीचा रंग हा प्रामुख्याने तपकिरी असतो. पाठीवर डोक्यापासून शेपटीपर्यंत काळी रेष असते.

हीच काळी रेष या जातीच्या शेळीची एक प्रकारे ओळख ठरवते. या जातीच्या शेळीची शिंगे मागे वाकलेली असतात. या जातीच्या शेळीची विशेषता म्हणजे ही शेळी बंदिस्त शेळीपालनात तसेच घराच्या अंगणात देखील पाळले जाऊ शकते. यासाठी कोणतीच विशेष तरतूद करावी लागत नाही.

आपल्याकडील हवामानात देखील या जातीची शेळी चांगली वाढते. म्हणजेच आपल्या राज्यातील हवामान या जातीच्या शेळीला मानवते. त्यामुळे या जातीचे सध्या महाराष्ट्रातील अनेक पशुपालक शेतकऱ्यांच्या माध्यमातून संगोपन केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या जातीची एक सर्वात मोठी विशेषता म्हणजे एका वेतात ही शेळी चार पिलांना जन्म देऊ शकते. विशेष म्हणजे या जातीच्या बकऱ्याचे मांस हे चवीला खूपच उत्कृष्ट असल्याने या जातीच्या मांसाला बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते.

यामुळे या जातीचे शेळीपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या जातीच्या दहा शेळ्यांचे संगोपन केले तरी वार्षिक अडीच ते तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न शेळी पालन व्यवसायातून सहजतेने प्राप्त करता येऊ शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा