शेळीपालन करताय का ? मग तज्ञ लोकांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच, शेळीपालन व्यवसायातून होणार लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Rearing : भारतात शेतीसोबतच शेळीपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू केला जात असल्याने हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.

आपल्या राज्यातही हा व्यवसाय हळूहळू वाढत आहे. गावागावात आता शेळीपालन करणारे शेतकरी वाढले आहेत. खरंतर शेळीपालन हा व्यवसाय निश्चितच फायदेशीर ठरू शकतो मात्र शेळीपालन व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये शेळींच्या योग्य जातींची निवड करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

चांगल्या सुधारित आणि प्रगत जातीं निवडून त्यांचे संगोपन केले तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न शेळी पालन व्यवसायातून मिळू शकते. अशा परिस्थितीत आज आपण तज्ञ लोकांनी कोणत्या शेळीच्या जातीचे संगोपन शेतकऱ्यांनी केले पाहिजे याबाबत काय मत व्यक्त केले आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

बारबरी शेळी : ही एक शेळीची प्रगत जात आहे. या जातीची शेळी मांस उत्पादनासाठी पाळली जाते. या जातीच्या शेळ्या सर्वाधिक विक्रीसाठी येतात. बकरीदमध्ये कुर्बानीसाठी या जातीच्या बोकडांना लोक खूप पसंत करत असतात. यामुळे या कालावधीमध्ये या जातीच्या बोकडांना चांगला दर मिळतो. अशा परिस्थिती शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जर या जातीच्या शेळीच्या संगोपन केले तर त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळणार आहे.

बीटल शेळी : या जातीच्या शेळ्या पंजाबमधील गुरुदासपूर, फिरोजपूर आणि अमृतसरच्या आसपासच्या प्रदेशात आढळतात. या व्यतिरिक्त देशातील इतरही भागात या जातीच्या शेळीचे संगोपन होते. या जातीच्या शेळीचे लांब पाय असतात. लांब व लोंबकळलेले कान असतात. लहान व पातळ शेपटी असते आणि शिंगे मागे वळलेली असतात. या जातीच्या प्रौढ शेळीचे वजन 50 ते 60 किलो आणि मादी शेळ्यांचे वजन सुमारे 45 किलो असते. बीटल बकरी मांसासाठी सर्वाधिक पाळली जाते.