Goat Rearing : भारतात फार पूर्वीपासून शेती समवेतच पशुपालनाचा व्यवसाय देखील केला जात आहे. पशुपालनाच्या व्यवसायात अनेक जण मोठ्या प्रमाणात शेळीपालन करत असल्याचे दिसते. गाय किंवा म्हैस पालनाच्या तुलनेत शेळीपालनाचा व्यवसाय कमी पैशांत आणि कमी जागेत सुरू करता येतो.
त्यामुळे या व्यवसायाकडे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाले आहेत. अनेकजण शेळीपालनाचा व्यवसाय करून चांगली कमाई करत आहे. शेळीपालनाचा व्यवसाय हा मुख्यत्वे मांस उत्पादनासाठी केला जातो.
यामुळे शेळीच्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध जातींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान आज आपण मांस उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या टॉप 3 शेळ्यांची जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
या जातीच्या बोकडांना बकरी ईदच्या काळात मोठी मागणी असते. यामुळे जर या जातीच्या शेळ्यांचे संगोपन करून चांगले जातिवंत बोकडांची निर्मिती केली तर शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकणार आहे.
मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या शेळ्यांच्या जाती
गोहिलवाडी : शेळीची ही जात पशुपालकांमध्ये मोठी लोकप्रिय आहे. या जातीचे बोकड बकरी ईदच्या काळात मोठ्या मागणीमध्ये असतात. गुजरात राज्यात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. खरे तर गुजरात वगळता इतर राज्यांमध्ये या जातीच्या शेळीचे पालन होत नाही.
त्यामुळे या जातीच्या बोकडांना मोठी मागणी असते. विशेष म्हणजे बकरी ईदच्या काळात यांना अधिक भाव मिळतो. या जातीचे बोकड सरासरी 50 ते 55 किलोचे बनते. या जातीच्या शेळीचे वजन देखील 40 ते 45 किलो एवढे भरते.
जखराना : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात या जातीच्या शेळीची मोठ्या प्रमाणात पालन होत आहे. या जातीच्या बोकडांना देखील बाजारात मोठी मागणी असते. या जातीच्या बोकडांचे वजन सरासरी 55 ते 60 किलोपर्यंत भरते. यामुळे या जातीचे संगोपन करून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत आहे.
बरबरी : या जातीच्या शेळीचे देखील मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. उत्तर प्रदेश मध्ये या जातीच्या शेळीचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते. या जातीचे बोकड हे बाजारात नेहमीच मागणी मध्ये असतात. या जातीच्या बोकडांचे वजन हे 30 ते 35 किलो एवढे असते.